मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अभिजीत बिचुकले कसब्याच्या मैदानात, 'ज्वलंत' प्रश्नांवरून पत्रकारांवरच भडकले, Video

अभिजीत बिचुकले कसब्याच्या मैदानात, 'ज्वलंत' प्रश्नांवरून पत्रकारांवरच भडकले, Video

बिगबॉस फेम आणि स्वत:ला कवीमनाचा नेता म्हणवणारे अभिजीत बिचुकले हे इतर निवडणुकींप्रमाणेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही पॅड बांधून उतरले आहेत.

बिगबॉस फेम आणि स्वत:ला कवीमनाचा नेता म्हणवणारे अभिजीत बिचुकले हे इतर निवडणुकींप्रमाणेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही पॅड बांधून उतरले आहेत.

बिगबॉस फेम आणि स्वत:ला कवीमनाचा नेता म्हणवणारे अभिजीत बिचुकले हे इतर निवडणुकींप्रमाणेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही पॅड बांधून उतरले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 7 फेब्रुवारी : बिगबॉस फेम आणि स्वत:ला कवीमनाचा नेता म्हणवणारे अभिजीत बिचुकले हे इतर निवडणुकींप्रमाणेच कसब्याच्या पोटनिवडणुकीतही पॅड बांधून उतरले आहेत. यानंतर पत्रकारांनी बिचुकले यांना कसबा मतदारसंघाची लोकसंख्या किती? या मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न काय? असे तिखट प्रश्न विचारले, पण या प्रश्नांची उत्तरं न देता बिचुकले उलट पत्रकारांवरच चिडले आणि त्यांना अद्वातद्वा बोलून निघून गेले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'मला भारताची लोकसंख्या माहिती आहे. मागच्या 40 वर्षात कसब्यातून निवडून गेले आहेत, त्यांनी काय केलं? त्यांना पहिले प्रश्न विचारा,' असं म्हणत अभिजीत बिचुकले पत्रकारांवरच संतापले आणि निघून गेले.

अभिजीत बिचुकले यांनी याआधी साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध अनेकवेळा निवडणुका लढल्या, तसंच 2019 विधानसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अभिजीत बिचुकले मराठी आणि हिंदी बिगबॉसमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. हिंदी बिगबॉसमध्ये तर बिचुकलेनी थेट सलमान खानसोबतच पंगा घेतला होता. नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत अभिजीत बिचुकले सगळ्याच निवडणुकीला उभे राहतात.

First published: