मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुख्यमंत्र्यांचा फोन, राज ठाकरेंचं पत्र, तरीही कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका होणार!

मुख्यमंत्र्यांचा फोन, राज ठाकरेंचं पत्र, तरीही कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका होणार!

चिंचवड आणि कसबा पेठ या पोटनिवडणुका लढण्यावर महाविकासआघाडी ठाम असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी प्रयत्न केले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 5 फेब्रुवारी : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना फोनही केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला. याशिवाय राज ठाकरे यांनीही पोटनिवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने उमेदवार देऊ नये, असं पत्र लिहिलं आहे. भाजपकडूनही या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण काँग्रेस या दोन्ही निवडणुका लढण्यावर ठाम आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 'एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी म्हणलं चर्चा करू. काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळकांना डावललं गेलं. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला अर्थ नाही. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील,' असं नाना पटोले यांनी सांगितलं.

'घरातला उमेदवार दिला गेला नाहीये. राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आहे, पण कोणाची वकिली चालण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदे बोलतात त्याच्या विरोधात फडणवीस वागतात,' असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे. कसब्याची जागा काँग्रेस लढवणार आहे, आम्ही भूमिका मांडू. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवेल, तिथे काय निर्णय होणार ते राष्ट्रवादीला विचारा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या दोन पोटनिवडणुका होत आहेत.

First published: