मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Kasba Bypoll Results : भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने खिंडार कसं पाडलं? या 3 गोष्टी ठरल्या गेमचेंजर!

Kasba Bypoll Results : भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने खिंडार कसं पाडलं? या 3 गोष्टी ठरल्या गेमचेंजर!

कसबा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा विजय कसा झाला?

कसबा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा विजय कसा झाला?

Kasba Bypoll Results : भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठा उलटफेर केला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का दिला आहे.

पुढे वाचा ...

चंद्रकांत फुंदे आणि वैभव सोनवणे

पुणे, 2 मार्च : भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठा उलटफेर केला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का दिला आहे. कसब्याची ही पोटनिवडणूक महाविकासआघाडी तसंच भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यात झाली.

कसब्यातील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण या पोटनिवडणुकीत भाजपनं मंत्री आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी फौज उतरवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र एवढं करुनही भाजपला आपला पराभव रोखता आला नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा हा बालेकिल्ला ध्वस्त केला.

धंगेकरांचा जनसंपर्क

काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. जनतेशी तगडा जनसंपर्क ही धंगेकरांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जात होती. नगरसेवक म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख बनली होती. जनतेत सहज मिसळण्याचा त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या विषयी आपुलकी असणारा मोठा वर्ग कसबा मतदारसंघात आहे. त्याचं मतदारांनी धंगेकरांना मदतीचा हात दिल्यामुळे त्यांचा विजय झाला.

भाजपमध्ये सुंदोपसुंदी

धंगेकरांच्या तुलनेत भाजपच्या हेमंत रासनेंचा जनसंपर्क कमी पडला. कसबा विधानसभा पोट निवडणुकीत भाजपची आपल्या पारंपरीक मतदारांवर सगळी दारोमदार होती. पण त्याच पारंपरीक मतदारांनी भाजपकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. त्याला कारणही तसचं आहे. उमेदवारीवरून भाजपात सुंदोपसुंदी पाहायला मिळाली होती. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्यामुळे टिळक कुटुंब नाराज असल्याची चर्चा होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर केली. तसेच ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार गिरीष बापट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

महाविकासआघाडीची एकजूट

कसबा पोट निवडणुक महाविकास आघाडी एकदिलानं लढली . काँग्रेससोबतचं अजित पवार, आदित्य ठाकरे या नेत्यांनी कसब्यात प्रचार केला. तिन्ही पक्षांनी एकत्रीतपणे ताकद लावली आणि विजय खेचून आणला. मात्र या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी हाच निर्णायक फॅक्टर ठरल्याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, NCP