मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसबा पोटनिवडणूक : काँग्रेसची अंतर्गत डोकेदुखी वाढणार? एका जागेसाठी 16 जणांच्या मुलाखती

कसबा पोटनिवडणूक : काँग्रेसची अंतर्गत डोकेदुखी वाढणार? एका जागेसाठी 16 जणांच्या मुलाखती

काँग्रेसची अंतर्गत डोकेदुखी वाढणार?

काँग्रेसची अंतर्गत डोकेदुखी वाढणार?

कसबा पोटनिवडणुकीसाठी एकट्या काँग्रेस पक्षातून तब्बल 16 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 31 जानेवारी : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षातून उमेदवार गुडघ्याला बांशिंग बांधून तयार असल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्ध भाजपमध्ये पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आली आहेत. प्रदेश स्तरावरील बैठकीनंतर तीन नावे अंतिम करून दिल्लीला पाठवली जातील. त्यानंतर एक किंवा दोन तारखेपर्यंत उमेदवार जाहीर होईल,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तर एकट्या काँग्रेस पक्षातून तब्बल 16 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.

एकट्या काँग्रेस पक्षातून तब्बल 16 उमेदवार इच्छुक

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक बिरविरोध होणार असल्याच्या शक्यता मावळल्या असून सर्वच पक्ष आता दावेदारी सांगत आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकट्या काँग्रेस पक्षातून तब्बल 16 उमेदवार इच्छुक आहेत. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या सर्व ईच्छुकांची नावे काँग्रेस हायकमांडकडे पाठवली जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचे ठरवले असले तरी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. असे झाल्यास भाजपला ही निवडणूक जिंकणे सोपे होईल.

वाचा - भाजपची विनंती अजितदादांनी लावली धुडकावून, राष्ट्रवादी घेणार पंढरपूरचा बदला?

भाजपकडेही इच्छूक

भाजपकडून ही निवडणूक बिरविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आम्ही गाफील राहणार नाही असं खुद्द पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अशात भाजपवर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भाजपमध्येच कसब्याच्या जागेसाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे नेमकं तिकीट कोणाला द्यायचं याबाबतची भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसब्यात भाजपकडून कोण कोण इच्छुक आहे आणि भाजपची अंतर्गत डोकेदुखी कशी वाढू शकते हे पाहणं गरजेचं आहे.

भाजपकडून ही नाव चर्चेत

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधूनही काही नावं पुढं येत आहेत. यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत.

First published:

Tags: Congress, Nana Patole, Pune