पिंपरी, 22 जानेवारी : कंजारभाट समाजातील लग्नानंतर घेतल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या तीन तरुणांना समाजातील जमावाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय, पिंपरी शहरातील भाट नगरमध्ये काल रात्री झालेल्या एका लग्न समारंभादरम्यान ही घटना घडली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील काही तरुणांनी "stop the v ritual" असा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून त्याद्वारे कौमार्य चाचणीविरोधात जन जागृति सुरू केली होती. मात्र हा प्रकार समाजाची बदनामी करणारा असल्याचा आरोप करत काल भाट समाजातील काही तरुणांनी वाद घातला आणि त्या नंतर त्यांच्याकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणांनी केलाय.
ह्या प्रकरणी आत्तापर्यन्त भाट समाजातील पाच तरुणांसह 40 जनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्यांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.