• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • नशीब बलवत्तर म्हणून आजी पुराच्या पाण्यातून बचावल्या !

नशीब बलवत्तर म्हणून आजी पुराच्या पाण्यातून बचावल्या !

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे घोड नदीत अडकलेल्या आजींना बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल साडेतीन तास हे प्रयत्न सुरू होते. शशिकला डोके असं या 70 वर्षीय आजीचं नाव आहे.

  • Share this:
जुन्नर, 26 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे घोड नदीत अडकलेल्या आजींना बाहेर काढण्यात यश आलं. तब्बल साडेतीन तास हे प्रयत्न सुरू होते. शशिकला डोके असं या 70 वर्षीय आजीचं नाव आहे. या आजी दुपारी घोड नदी पात्रात धुणं धुवायला गेल्या होत्या. मात्र सकाळ पासून डिंभे धरण क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने, धरणातून 12,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळं नदीतील पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि आजी नदीतील मध्यभागी असलेल्या खडकावर अडकल्या. पाण्यात हळू-हळू लक्षणीय वाढ होत होती. दरम्यान मंचर पोलीस ही घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफ पथकालाही याबाबत कळविण्यात आले. घोडेगाव इथल्या निसर्ग साहस संस्थेनंही मदत केली. अखेर या सर्वांच्या अथक प्रयत्नातून नदीच्या खडकावर धुणं धुवायला गेलेल्या आजींना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात प्रशासनाला यश आलं.
First published: