मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मिनी Lockdown! जेजुरीत खंडोबाच्या गडाचे दरवाजे 7 दिवस बंद

मिनी Lockdown! जेजुरीत खंडोबाच्या गडाचे दरवाजे 7 दिवस बंद

प्रशासनानं मिनी लॉकडाऊन सक्तीनं राबवायला सुरुवात केली आहे.

प्रशासनानं मिनी लॉकडाऊन सक्तीनं राबवायला सुरुवात केली आहे.

प्रशासनानं मिनी लॉकडाऊन सक्तीनं राबवायला सुरुवात केली आहे.

पुणे, 3 एप्रिल :  जिल्हा, शहर व ग्रामीण परिसरातील कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2 एप्रिल पासून प्रशासनानं कडक निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर भाविकांसाठी 9 एप्रिल पर्यंत बंद असेल. त्यामुळं कृपया भाविकांनी जेजुरीत देवदर्शनासाठी येऊ नये असं आवाहन देव संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे.

खंडोबाच्या गडाचे दरवाजे बंद करण्यात आले असले तरी श्रींचे नित्याचे धार्मिक विधी आठवडेकरी पुजारी व मोजके सेवेकरी, वारकरी यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र जेजुरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबंदीचे नागरिकांकडून कडक पालन करण्याच येत आहे. सायंकाळी सहानंतर संपूर्ण व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून संपूर्ण शहरात संचार बंदीचं पालन केलं.

वाचा - देशात 89 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मृतांच्या आकड्यानं गाठला नवा उच्चांक

व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करत वेळेत दुकानं बंद केली. मात्र काही नागरिक बाहेर फिरत असल्याचं लक्षात आल्यानं पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकेबंदी करत बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी केली. विनाकारण बाहेर फिरणारे किंवा कोविडच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईदेखिल करण्यात येत आहे.

वाचा - नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाचा विचार करून पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधताना दोन दिवसांत पुढील उपाययोजना ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार दोन दिवसांत लॉकडाऊन लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यापूर्वीच पुण्यात प्रशासनानं मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळं आता नागरिक याला कसे सामोरे जाणार हे पाहावं लागणार आहे.

First published:

Tags: Jejuri, Lockdown, Pune