Home /News /pune /

पुणे पोलिसांसोबत ऑन ड्युटी 3 पायाचा श्वान, PHOTO पाहून जॉन अब्राहमही भारावला

पुणे पोलिसांसोबत ऑन ड्युटी 3 पायाचा श्वान, PHOTO पाहून जॉन अब्राहमही भारावला

'राजा नावाचा हा श्वास लॉकडाऊन लागल्यापासून बालगंधर्व चेकपोस्टवर आमच्यासोबत आहे, तो टीमचाच एक भाग झालेला आहे'

    पुणे, 25 मे: 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. पुण्यात कोरोनामुळे (Pune Lockdown) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पुणे पोलीस जीवाची बाजी लावून पहारा देत आहे. पुणे पोलिसांच्या मदतीला एक खास रक्षक पाहाण्यास मिळाला आहे. SPO राजा नावाचा 3 पायाचा कुत्रा पोलिसांना मदत करत असल्याचं समोर आलं आहे.  खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी SPO राजाचे फोटो ट्वीट करून कौतुक केले आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकातील चेकपोस्टवर एका तीन पायाच्या कुत्र्याचा फोटो व्हायरल झाला आहे. तीन पायाचा हा श्वान पोलिसांना जगंली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चेकपोस्टवर पोलिसांना मदत करतो. या कुत्र्याचे पुणेकरांनी कौतुक केले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्वीट करून राजाचं कौतुक केलं आहे. आमचा हा खास पोलीसमित्र आहे, 3 पायाचा हा श्वासन बालगंधर्व येथील चेकपोस्टवर एक जागरुक सहकाऱ्याप्रमाणे काम करतोय. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत होता, असं म्हणत अमिताभ गुप्ता यांनी कौतुक केले.  पुणेकरांनीही राजाचे कौतुक करत त्याची देखभाल केल्याबद्दल पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. तसंच, बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) याने सुद्धा राजाच्या कामाचे कौतुक करत ट्वीट केले आहे. 'पुण्यातील हा तीन पायाचा श्वान सर्व ताकदपणाला लावून शहराची सेवा करत आहे' असं म्हणत जॉनने राजाचं कौतुक केले आहे. 'राजा नावाचा हा श्वास लॉकडाऊन लागल्यापासून बालगंधर्व चेकपोस्टवर आमच्यासोबत आहे, तो टीमचाच एक भाग झालेला आहे. फार पूर्वी त्याने आपला पाय गमावला होता. पण, आम्ही त्याची काळजी घेतो, त्याला जेवण सुद्धा देत असतो, आता टीमचाच एक भाग आहे, असं चेकपोस्टवरील पोलिसांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या