Home /News /pune /

चक्क टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानानं जन्माला आलं रेडकू! भारतातील पहिलीच घटना

चक्क टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानानं जन्माला आलं रेडकू! भारतातील पहिलीच घटना

विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाने म्हशीचं रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश

    सुमित सोनवणे (प्रतिनिधी), दौंड, 8 ऑगस्ट: विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाने म्हशीचं रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश आलं आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावामधील सोनवणे फार्ममध्ये हा प्रयोग यशस्वी झाला. दुभत्या म्हशींच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. प्रयोगशाळेत म्हशीचा गर्भ वाढवून गर्भधारणा करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. हेही वाचा...उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली मोठी तयारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहू या गावाजवळ असलेल्या म्हशींच्या मोठ्या फार्ममध्ये म्हशींची पारडे 'आयव्हीएफ' पद्धतीनं जन्माला आली आहेत. या पद्धतीने पारडे जन्माला घालण्याचा हा असा भारतातील हा पहिलाच उपक्रम 'जेकेबोवाजेनिक्स' या 'जेके ट्रस्ट'मधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने दुग्ध व्यावसायिक रामराव सोनवणे यांच्या फार्ममध्ये राबवण्यात आला आहे. साधारण पुण्याजवळील 'सोनवणे बफेलो फार्म'मध्ये 4 म्हशींपासून या 5 आयव्हीएफ पारडांचा जन्म झाला. यात एका जुळ्या पारडांचाही समावेश आहे. भारतात आयव्हीएफ तंत्रामार्फत जुळी पारडे जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. ही पारडे मुऱ्हा जातीची आहेत. म्हशींमधील जगातील नामांकित जातींपैकी ही एक जात आहे. अशा प्रकारचा एकमेव उपक्रम असून यातून देशातील दुग्ध उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकेल. आजच्या संदर्भात आपली देशी जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या दुधात आजारांशी लढण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्ये असतात.भारतात दुग्धजन्य उत्पादनांमध्ये वाढ झाल्याने खेड्यांमध्ये तळागाळात अधिक प्रगती होऊ शकेल, अशी माहिती जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर यांनी दिली. हेही वाचा...LIVE VIDEO: वडापाव सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 5 जण होरपळले, 3 गंभीर भारतात दुभती जनावरे व म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या उद्दिष्टाने 'जेकेबोवाजेनिक्स'ची स्थापना 'जेके ट्रस्ट'ने 2016 मध्ये केली. महाराष्ट्रातील पुण्याजवळील 'कॅटल ईटी-आयव्हीएफ लॅब'मध्ये यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर, भारतीय शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रथमच चार 'मोबाइल ईटी-आयव्हीएफ व्हॅन' स्थापित केल्या. या व्हॅन्स शेतकऱ्यांच्या दारात प्रत्यक्ष नेण्यात येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात दुग्ध क्रांती घडून येणार आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Pune news, Test tube baby

    पुढील बातम्या