S M L

पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या

पुण्यात बाणेर इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करून सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केलीय. पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर 4 वर्षाचा मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता.

Sonali Deshpande | Updated On: Jan 19, 2018 01:18 PM IST

पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या

19 जानेवारी : पुण्यात बाणेर इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करून सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केलीय.

पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर 4 वर्षाचा मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पत्नीचा व मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. ते बाणेर येथील एका कंपनीत कामाला होते. पत्नी भूमिका आणि चार वर्षांचा मुलगा नक्ष बरोबर ते बाणेरमध्ये राहत होते.  मागील दिवसांपासून पटेल यांचे घर बंद होते. अनेक दिवस घर बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरामध्ये तिघांचे मृतदेह अाढळले.

या तिघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close