मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भारीच की! आता तुरुंगात असणार सलून आणि कैदीच होणार हेअर आरर्टिस्ट

भारीच की! आता तुरुंगात असणार सलून आणि कैदीच होणार हेअर आरर्टिस्ट

कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि तुरुंगातून सुटल्यानंतर कैदी पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळू नये यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. आता कैदी इस्त्री, दाढी आणि कटिंग करताना दिसणार आहे. त्यामुळं कैद्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि तुरुंगातून सुटल्यानंतर कैदी पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळू नये यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. आता कैदी इस्त्री, दाढी आणि कटिंग करताना दिसणार आहे. त्यामुळं कैद्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि तुरुंगातून सुटल्यानंतर कैदी पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळू नये यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. आता कैदी इस्त्री, दाढी आणि कटिंग करताना दिसणार आहे. त्यामुळं कैद्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 18 जानेवारी: पुण्यातील येरवाडा कारागृहातील कैदी आता दाढी, कटिंग करताना दिसणार आहे. येवढचं नाही तर काही कैद्यांना इस्त्री करण्याचं काम देण्यात आलंय. कारागृहात विविध गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता वेगळी कामे दिली जाणार आहे. त्याची सुरवातही करण्यात आली आहे. आधी कैद्यांना शेतीतील कामे दिली जात होती. मात्र आता कैद्यांना वेगळी कामे कऱण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करण्यात येणार आहे. दाढी, कटिंग सलूनचं उदघाटन तुरुंगात कैद्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ओपन जेलमध्ये कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येतंय. त्याचाच एक भाग म्हणून येरवाडा कारागृहात कैद्यांसाठी इस्त्रीचं आणि दाढी, कटिंगच्या दुकान सुरू करण्यात आलं आहे. कारागृहाचे उपनिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते या दुकानाचं उदघाटन करण्यात आलं आहे. कैदी दाढी, कटिंग करून पैसे तर मिळवतीलचं शिवाय शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना उपजिविकेचं साधन मिळणार आहे. कैदी सुधारणा आणि पुनर्वसन योजने अंतर्गत पुण्यात येरवडा कारागृहातील कैद्यांना घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला इस्त्री, दाढी, कटिंगचे दर काय? कारागृह परिसरात कैद्यांनी सुरू केलेल्या इस्त्री आणि दाढी, कटिंगच्या दुकानातील दर माफक ठेवण्यात आले आहे. शर्ट आणि पॅन्टची इस्त्री करण्यासाठी पाच रुपये ठेवण्यात आले आहे. तर साडीची इस्त्री करण्यासाठी 15 रुपये दर ठेवण्यात आला आहे. तर दाढीचा तर 40 रुपये ठेवण्यात आला आहे. कटिंगसाठी ग्राहकांना केवळ 60 रुपये मोजावे लागणार आहे. इतर दुकानापेक्षा दर कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं ग्राहकांनी कैद्यांकडून दाढी आणि कटिंग करून घेतल्यास फायदा होणार आहे. प्रशिक्षणामुळं कैदी समाधानी येरवाडा कारागृहानं दिलेलं प्रशिक्षण लाख मोलाचं असल्याचं कैद्यांनी सांगितलं आहे. या प्रशिक्षणातून जीवन जगण्याची उमेद निर्माण झाल्याचं कैद्यांनी सांगितलं आहे. झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या उमेदीनं जिवन जगणार असल्याचं कैदी म्हणाले. तसेच उपक्रम राबवून प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांनी तुरुंग प्रशासनाचे आभार मानले आहे. का दिलं जातंय कैद्यांना प्रशिक्षण? विविध कारणांमुळं कैदी तुरुंगात शिक्षा भोगतात. मात्र शिक्षा भोगून झाल्यानंतर कैद्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये. त्यांच्यातील चांगला माणूस जागा व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. शिक्षा भोगून झाल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळू नये यासाठी त्यांना विविध कामांचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेतलेला कैदी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यानं घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उदरनिर्वाह करेल. आणि तो पुन्हा गुन्हेगारी जगतातकडे वळणार नाही यासाठी कैद्यांना प्रशिक्षण दिलं जातं. विविध प्रशिक्षणातून कैद्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. तसेच त्यांनी घेतलेल्या प्रशिणामुळं चांगल्या प्रकारे जीवन जगण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण होते. येवढचं नाही तर कैद्यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर जग बंदिशाळा वाटू नये आणि कारागृह म्हणजे सुधारगृह हेही सार्थ ठरावं यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Prisoners news, Prisoners traning news, Yerwada prisoners news

    पुढील बातम्या