मराठी बातम्या /बातम्या /पुणे /IPL च्या सामन्यावर पुण्यात लाखोंचा सट्टा, 2 बुकींना अटक; तब्बल 92 लाखांची रोकड जप्त

IPL च्या सामन्यावर पुण्यात लाखोंचा सट्टा, 2 बुकींना अटक; तब्बल 92 लाखांची रोकड जप्त

 दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली.

दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली.

दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली.

पुणे, 27 सप्टेंबर : दुबईमध्ये (dubai) सुरू असलेल्या आयपीएलच्या (ipl 2021) सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी (pune police) केला आहे.  या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बड्या बुकींना (Bookies) ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून तब्बल 92 लाख रुपयांची रोख रक्कम आणि ऐवज जप्त केला आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टाकिंग गणेश भुतडा (ganesh bhutada) व अशोक देहूरोडकर (ashok dehuroadkar) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथकं तयार केली होती.

T20 वर्ल्ड कप जिंकण्याची रणनीती 'या' हॉटेलमध्ये ठरणार, धोनीशी आहे खास कनेक्शन

दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. दोन्ही ठिकाणावर 92 लाख रुपये रोख आणि 65 हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात 500 आणि 2000 च्या नोटा आढळून आल्या आहे. तसंच, अकाऊंटमध्येही लाखो रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन  जप्त केले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेकांची धागे हाती लागले आहेत. त्यामुळे या बुकिंबाबत अजून तपास पोलीस करत आहेत.

तरुणाचं Ex-Girlfriend सोबत विकृत कृत्य; आधी मारहाण, मग सूटकेसमध्ये भरलं अन्..

विशेष म्हणजे, काल रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किग्स असे दोन मोठे सामने झाले. रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला होता. त्यामुळे बुकिंकडून मोठी रक्कम आढळून आली आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

First published: