Weather Alert: पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Weather Alert Today: पुढील तीन तासांत मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

Weather Alert Today: पुढील तीन तासांत मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

  • Share this:
    पुणे, 11 जुलै: जवळपास तीन आठवड्यांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा मान्सूननं वापसी (Monsoon Comeback) केली आहे. यानंतर आता कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस कोकण (Konkan) आणि घाट परिसरात (Ghat area) जोरदार पावसाची (Rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही (Heavy rainfall) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्यानं जारी केलेल्या सुधारीत माहितीनुसार, पुढील तीन तासात घाट परिसरात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची धुव्वाधार बॅंटींग पाहायला मिळणार आहे. आज सकाळपासूनचं या परिसरात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. हेही वाचा-महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या 2 व्हेरिएंटची लागण; 5 दिवसात जे घडलं त्यानं... याशिवाय मराठवाड्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांत देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात विजांच्या गडगडाटासह वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-काय सांगता ! ...नाहीतर दरवर्षी घ्यावी लागेल कोरोनाची लस, तज्ज्ञांनी दिला इशारा कोकणात रेड अलर्ट पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दोन दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत 210 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात विजांच्या कडकडासह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: