पुणे 11 ऑक्टोबर: राज्यात आता Unlockची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने सर्व व्यवहास सुरू करण्यासाठी काही क्षेत्रांना परवानगी दिली आहे. हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी क्लासेसच्या संस्था चालकांनी लॉकडाउन उठवण्याची मागणी केली आहे. या संस्थाचालकांनी पुण्यात रविवारी बैठक झाली त्या बैठकीनंतर त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. 1 नोव्हेंबरपूर्वी क्लासेस घेण्याला परवानगी द्या नाही तर राज्यातले सर्व क्लासेस एकाच दिवशी सुरू करू असा इशाराही संघटनेने दिला आहे. खासगी कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष प्रा.पांडुरंग मांडकीकर यांनी दिला आहे.
मांडकीकर म्हणाले, राज्यात 25 हजार खासगी कोचिंग क्लासेस कार्यरत असून या व्यवसायावर 25 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना लॉकडाउनमुळे गेल्या मार्चपासून सर्व क्लासेस बंद आहेत. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने याचा विचार करून आम्हाला क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
खासगी संस्था चालक सरकारच्या कोविड नियमांचे पालन करायला तयार आहेत अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेतात. या क्लासेसचं लोण आता छोट्या शहरांमध्येही पसरलेलं आहे.
राज्यात नव्या रुग्णांमध्ये 40 टक्क्यांची घट, तर कोरोनामुक्त होणाऱ्यामध्ये वाढ
महाराष्ट्रात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने आता कोरोनामुक्तीमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
तर राज्यातही रुग्णांची संख्या कमी होत आहे. मागील 4 आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत.
भारतात सलग 8 दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 1 हजारांपेक्षा कमी
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात 1 लाख 53 हजार 331 एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात 92 हजार 246 एवढी आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत जवळपास 40 टक्के घट झाली आहे.
10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.