मराठी बातम्या /बातम्या /पुणे /VIDEO : काठोकाठ भरलेलं धरण...पावसाळी वातावरण...मधोमध अडकला अजित दादांचा तराफा, अन्...

VIDEO : काठोकाठ भरलेलं धरण...पावसाळी वातावरण...मधोमध अडकला अजित दादांचा तराफा, अन्...

यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला

यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला

यानंतर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला

पुणे, 8 ऑक्टोबर : आज पुणे (Pune) जिल्ह्यातील कासारसाई धरणात (Kasarasai Dam) मत्स्य प्रकल्पाची पाहणारी करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) गेले होते. येथे घडलेल्या एका घटनेची सध्या चर्चा सुरू आहे. अजित पवासांसोबत येथे आज घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितलं जात आहे. या घटनेत नक्कीच अजित पवारांच्या काळजाचा ठोका चुकला असेल.

कासारसाई धरणात मत्स्य प्रकल्पाची पाहणी करताना तराफा बंद पडल्याने अजित पवार मधोमध अडकून पडले. यानंतर अधिकाऱ्यांनी दुसरी बोट आणून त्यांची तत्काळ सुटका केली. पर्यटक जास्त झाल्याने तराफा बंद पडला असावा. अजितदादा धरणातून बाहेर पडेपर्यंत अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अजित पवारांनी लाईफ जँकेट घातलं होतं. मात्र काही वेळासाठी वातावरण तंग झालं. इथल्या पर्यटनासाठी ही अशी कसरत करावी लागते असं म्हणत अजितदादांची मिश्किल टिपण्णी केली. मावळ तालुक्याच्या कासारसाई धरणात संध्याकाळी ही घटना घडली.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने काल (7 ऑक्टोबर 2021) छापेमारी (Income Tax Raid) केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा-अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी छापेमारी

अजित पवारांच्या बहीण रजनी इंदुलकर (Rajani Indulkar) यांच्या घरी सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि झाडाझडती सुरू आहे. जवळपास 27 तासांपासून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईवर अजित पवारांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Pune, Video viral