माणुसकीला सलाम! हिंदू व्यक्तिच्या अंत्यविधिसाठी मुस्लिम तरुणांचा पुढाकार

माणुसकीला सलाम! हिंदू व्यक्तिच्या अंत्यविधिसाठी मुस्लिम तरुणांचा पुढाकार

सामाजिक एकोपा जपत मुस्लिम बांधवांनी राम शेकू क्षीरसागर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू स्मशान भूमीमध्ये 'राम नाम सत्य है' चा जप करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

  • Share this:

पुणे 24 मे : लॉकडाऊन सध्या सगळेच व्यवहार बदलून गेले आहेत. या परिस्थितीत जर कोणी मृत पावलं तर त्यांच्याकडे कोणाला जाता सुद्धा येत नसल्याचं चित्र आहे. अशीच एक घटना पुण्याजवळील  केसनंद मध्ये घडली घडली. एका हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे वेळेवर पोहोचू शकले नव्हते. मात्र याचवेळी सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत हिंदू मुस्लिम बांधवांनी त्या हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.

केसनंद येथील राम शेकू क्षीरसागर यांचे काल निधन झाले. त्याच्या जवळ कोणीही नसल्याने त्यांच्या अंत्यविधी कसा करणार हा प्रश्न उभा राहिला. अशावेळी परिसरातील  राहणारे मुस्लिम बांधवही पुढे आलेत. हिंदू मित्रांच्या सहकार्याने त्यांनी माणुसकीचं नवं रुप जगाला दाखवून दिलं.

सामाजिक एकोपा जपत हिंदू मुस्लिम बांधवांनी राम शेकू क्षीरसागर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू स्मशान भूमीमध्ये 'राम नाम सत्य है' चा जप करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी जानमहमद पठाण, आप्पा शेख, रहिमभाई शेख, आसीफ शेख, शद्दाम शेख, अलताप शेख, साहेबराव जगताप, बच्चन आंळदे गावचे पोलिस पाटील पंडित हरगुडे  यांनी पुढाकार घेत हा शेजार आणि माणुसकीचा धर्म पाळला.

हे वाचा - कोरोनाविरुद्ध चीनची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, कोणत्याही देशाला जमलं नाही असं काम

ते म्हणाले सध्या अशाच माणुसकीची गरज आहे. कोरोनाच्या या महामारीत अशा सामाजिक एकोप्याच्या घटना माणुसकीचे नवे आयाम दाखवत आहेत.

हेही वाचा - 

आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

कोरोनाच्या संकटात किम जोंग रचत आहेत खतरनाक प्लॅन, बैठक घेऊन जगाला दिला इशारा

 

First published: May 24, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading