पुणे 26 जानेवारी : इंडियन व्हिसलर असोसिएशनतर्फे 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' हे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे गीत शिट्टी (शीळ ) वर वाजवण्यात आलं. 50 शीळ वादकांनी प्रत्यक्ष न भेटता Online tracks बनवले होते. भारतातील 17 शहरे आणि जगभरातील काही ठिकाणी हे शीळ वादक होते. त्यांनी अत्यंत समन्वयाने हे अतिशय सुमधूर गीत सादर केलं. हे गीत ऐकून कुणीही थक्क झाल्याशीवाय राहणार नाही. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झालेल्या 150 व्हिसलर पैकी यात 50 जणांचा समावेश आहे. Guinness World Records कडे याची वाटचाल सुरू आहे. आज 71 व्या प्रजासत्ताकदिना निमित्त सोशल मीडियावरही हे गाणं चांगलंच व्हायरल झालंय.
किंग खान म्हणतो, 'माझी पत्नी हिंदू, मी मुस्लिम तर मुलं...'
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'मध्ये देशवासियांशी संवाद साधला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान गेली 5 वर्ष मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधत आहेत. आज प्रजासत्ताक दिन असल्याने त्यांच्या संबोधनाला विशेष महत्त्व होतं.
त्याचबरोबर हा भाग हा नव्या वर्षातला पहिलाच असल्याने त्यांनी यात गेल्या पाच वर्षातल्या विविध मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. त्यात नोटबंदी, जीएसटीसह अनेक निर्णय होते. कितीही मोठा निर्णय घेतला तरी जोपर्यंत त्यासाठी लोक काम करत नाहीत तोपर्यंत तो निर्णय खऱ्या अर्थाने अंमलात येवू शकत नाही असंही पंतप्रधान म्हणाले.
स्वच्छ भारत अभियान हे लोकचळवळ झालं त्यामुळे ते यशस्वी झालं. त्याचप्रमाणे सर्व योजना या जेव्हा लोक चळवळी होतील तेव्हाच त्या यशस्वी होतील असंही त्यांनी सांगितलं. मनकी बात मधून पंतप्रधान देशभरातल्या सकारात्मक गोष्टींचा उहापोह करतात. याही संबोधनात त्यांनी तामिळनाडूचा जल पुनर्भरण कार्यक्रम आणि इतर काही चळवळींचीही माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.