• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'भारतमाता 70 वर्षे रडत होती, 2014 नंतर हसायला लागली', चंद्रकांत पाटलांसमोर गोविंददेवगिरींचं वक्तव्य

'भारतमाता 70 वर्षे रडत होती, 2014 नंतर हसायला लागली', चंद्रकांत पाटलांसमोर गोविंददेवगिरींचं वक्तव्य

''सगळ्या परंपरा खोट्या ठरवण्यात आल्यात. आपला इतिहास, भूगोल आणि तीर्थ खोटे ठरवण्यात आले'

''सगळ्या परंपरा खोट्या ठरवण्यात आल्यात. आपला इतिहास, भूगोल आणि तीर्थ खोटे ठरवण्यात आले'

''सगळ्या परंपरा खोट्या ठरवण्यात आल्यात. आपला इतिहास, भूगोल आणि तीर्थ खोटे ठरवण्यात आले'

  • Share this:
पुणे,13 नोव्हेंबर : आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत अभिनेत्री कंगना रनौतने (kangana ranaut) भारताच्या स्वातंत्र्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. तर दुसरीकडे, 'भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली' असं विधान स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami Govinddevgiri Maharaj) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) सुद्धा हजर होते. पुण्यात 'समग्र वंदे मातरम' ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी कंगना राणावतच्या वक्तव्याची रिघ ओढत वक्तव्य केलं आहे. 'भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली. आज भारत माता रडतेय का हसतेय याचा विचार करण्याची गरज आहे, असं विधान स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी केलं. 'सगळ्या परंपरा खोट्या ठरवण्यात आल्यात. आपला इतिहास, भूगोल आणि तीर्थ खोटे ठरवण्यात आले. रामाने बांधलेला रामसेतू हा रामाने तयारच केला नाही, असे दावे करण्यात आले तसे वातावरण तयार करण्यात आले. हे पाप आधीच्या सरकारने केले आहे, असं म्हणत स्वामींनी काँग्रेसवर टीका केली.  स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. पुरेशी झोप न घेतल्यास होऊ शकतात `हे` गंभीर आजार; आयुष्य होईल 12 टक्क्यांनी कमी दरम्यान, त्याआधी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी कंगना राणावतच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. 'देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असे वाद्गग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. तिच्या विधानावर प्रतिक्रियावर विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली. 'कंगना राणावतचं ते विधान चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही पण मोदी सरकारसंबंधीचे विधान काही अंशी बरोबरही आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: