मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे-सोलापूर हायवेवर अपघातानंतर कुटुंबासोबत घडली लाजीरवाणी गोष्ट

पुणे-सोलापूर हायवेवर अपघातानंतर कुटुंबासोबत घडली लाजीरवाणी गोष्ट

कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

    इंदापूर, 14 नोव्हेंबर : माणूस संवेदनहीन होत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली आहे. दुचाकी अपघातानंतर अपघातग्रस्त कुटुंबाची 41 हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. इंदापूर तालुक्यातीलच रहिवाशी असणाऱ्या 52 वर्षीय बाळुबाई महादेव आनरसे यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. बाळुबाई आनरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं लोणी देवकर इथं एक भाजीपाल्याचं दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकानातील काम आटोपून बाळुबाई आनरसे या आपल्या नातवंडांसह दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी वाटतेच आनसरे कुटुंबाच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. याचाच फायदा घेत काही अनोखळी इसम तिथे आले आणि त्यांनी आनरसे यांच्याकडील सोने आणि मोबाईल असा 41 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हेही वाचा - पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की थेट गुन्हाच दाखल झाला! जखमी कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांची लूट करण्यात आल्याचा हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. तसंच या घटनेबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी इंदापूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या