बारामतीत एक वर्षाच्या चिमुरडीला कोरोना, एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण

बारामतीत एक वर्षाच्या चिमुरडीला कोरोना, एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण

9 जणांचा रिपोर्ट समोर आले आहेत. भाजी विक्रेत्याचा मुलगा व सुनेला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

  • Share this:

बारामती, 8 एप्रिल: देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात बारामती शहरात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकाच  कुटुंबातील वडीलांसह, मुलगा, सून, आठ वर्षाची मुलगी आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून आता शहरातील भाजीविक्रेते, मासळी आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा... FACT CHECK : तबलिगीवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट अमित शहांना प्रश्न?

बारामतीत एका रिक्षाचालकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवध्या आठ दिवसांनी शहरातील भाजी विक्रेता करणाऱ्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीशी जो-जो संपर्कात आला. त्यांचा शोध घेत आला. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना तपासणी करण्यासाठी बारामतीहून पुण्याला नेण्यात आले होते. या व्यक्तींपैकी 9 जणांचा रिपोर्ट समोर आले आहेत. त्यपैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  तरी आणखी तिघांचे रिपोर्ट यायचे असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे त्यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा... कॉन्स्टेबलचा प्रताप, पोलीस गाडीत बसून केली बिअर पार्टी आणि Facebook Live

बारामती शहरात कोरोना या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने या भागातील तीन किलोमीटरचा परिसर केला आहे. पाच किलोमीटर अंतराचे क्षेत्र बफर झोन म्हणून नियंत्रित केले आहे. शहरातील येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कुठल्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन, प्रशासनातर्फे हे करण्यात आले आहे.

हेही वाचा... दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा निर्माता COVID-19 च्या विळख्यात

दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भाग सील करण्यात आला आहे. पुण्यातील खडक, कोंढवा, फरासखाना, स्वारगेट पोलिस ठाण्याची हद्द सील करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत कडक आदेश देण्यात आले आहेत. या भागात 10 ते 12 तास जीवनावश्यक वस्तू खरेदीला मुभा देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये घरकुल रेसिडन्सी, जामा मज्जीद भोवतीचा खराळवाडी परिसर, शिवतीर्थ नगर, पडवळ नगर थेरगावआणि कमलराज रेसिडन्सी रोडे हॉस्पिटल, दिघी-भोसरीचा परिसर सील करण्यात आला आहे.

हेही वाचा... केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत या परिसरात सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी तर या परिसरातील नागरिकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, महापालिका प्रशासनच कठोर पाऊल उचलत असून घाबरू न जाता आणि अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आवाहन केले आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2020 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading