मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

BREAKING : MPSC 2021 च्या भरतीत 100 जागांची वाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

BREAKING : MPSC 2021 च्या भरतीत 100 जागांची वाढ, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

आधीच कोरोनाच्या काळामुळे या परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, 08 ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्यसेवा 2021 पूर्व परीक्षेची जाहिरात काढण्यात आली आहे. पण आता या जाहिरातीत आणखी 100 जागांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता 290 ऐवजी 390 जागांसाठी परीक्षा होणार आहे. चार दिवसांपूर्वीच राज्यसेवा परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.उपजिल्हाकारी, डीवायएसपी, मुख्याधिकारी, उपनिबंधक पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आधीच कोरोनाच्या काळामुळे या परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जलसंपदा विभाग उस्मानाबादेत पदांसाठी पदभरती

दरम्यान, जलसंपदा विभाग उस्मानाबाद (Osmanabad Jalsampada Vibhag Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Osmanabad Patbandhare Vibhag) जारी करण्यात आली आहे. अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) - एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) -

सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 किंवा शाखा अभियंता या पदांवरून सेवानिवृत्त झालेले उमेदवार या पदभरतीसाठी पात्र असणार आहेत. तसंच संबंधित पदानुसार उमेदवारांचं सजिक्षां झालं असणं आवश्यक आहे.

ही असणार जबाबदारी

जलसंपदा विभगातील सिंचन आणि बांधकाम प्रकारासाठी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल तयार करणे. निविदा शर्ती, आर्थिक तरतूद, भूसंपादन, पुनर्वसन इत्यादी काम करण्याची जबाबदार या अधिकाऱ्यावर असणार आहे

First published: