• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • लॉकडाऊनच्या काळात पुरुषांवरील अत्याचारात वाढ, पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा

लॉकडाऊनच्या काळात पुरुषांवरील अत्याचारात वाढ, पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Crime in Pune: लॉकडाऊनच्या काळात पत्नींच्या तुलनेत पतीवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचा (crime against men during lockdown) धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या 'ट्रस्ट सेल'ने केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 जून: मागील दीड वर्षांपासून देशात लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांना 'वर्क फ्रॉम होम'चा (Work From Home) अवलंब करावा लागला आहे. परिणामी 24 तास पती-पत्नी घरातच असल्याने त्यांच्यात अनेकदा खटके (Husband Wife Hassle) उडत आहेत. दरम्यान कौटुंबीक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ (Increase domestic violence case) झाली आहे. पण लॉकडाऊनच्या काळात पत्नींच्या तुलनेत पतीवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचा (crime against men during lockdown) धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या 'ट्रस्ट सेल'ने केला आहे. ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितलं की, मागील दीड वर्षात तीन हजाराहून अधिक घरगुती वादाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी प्रकरणं मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाची आहेत. काही तक्रारींमध्ये असाही दावा केला आहे की, भांडण झाल्यानंतर  त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहेरी गेल्या आहेत. त्या अद्याप परत आल्या नाहीत, त्यामुळे पुरुषांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सुजाता शानमे यांनी पुढं सांगितलं की, 24 तास बंद खोलीत एकटं राहिल्यामुळे नवरा बायकोंमधील मानसिक तणाव वाढत गेला आहे. छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहेत. अशा लोकांना कॉलवरून किंवा ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन करून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील दीड वर्षात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या छळ झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. हे ही वाचा-पतीची हत्या करत महिलेचं विकृत कृत्य, गुप्तांग कापून तेलात तळलं आणि मग... लॉकडाऊनपूर्वी एका वर्षात 1283 जणांनी पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी केल्या होत्या. यामध्ये 791 तक्रारी बायकाच्या होत्या, तर यामध्ये केवळ 252 तक्रारी पुरुषांच्या होत्या. पण लॉकडाऊन दरम्यान म्हणजेच मागील 15 महिन्यांत ही घरगुती हिंसाचाराची संख्या वाढून 3 हजार 75 वर पोहोचली आहे. यामध्ये महिलांवर अत्याचार होणाऱ्या तक्रारीची संख्या 1540 आहे, तर पुरुषांवरील अत्याचारांची संख्या 1535 एवढी आहे. पुरुषांवरील अत्याचाराचा आकडा लॉकडाउनच्या आधीच्या वर्षापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
  Published by:News18 Desk
  First published: