पुणे, 13 सप्टेंबर : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यात आता स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता राजकीय पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्या पाठोपाठ शांताबाईफेम (shantabai song) गीतकार आणि गायक संजय लोंढेही (sanjay londhe) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
'शांतीबाई...' गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला ठेका धरायला लावणारे गीतकार आणि गायक संजय लोंढे आता राजकीय आखाड्यात आपलं नशीब आजमावणार आहे. १६ सप्टेंबर रोजी संजय लोंढे हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात हा प्रवेश सोहळा होणार आहे. संजय लोंढे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
भारतीयांसाठी खूशखबर! COVAXIN ला या आठवड्यात WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता
तर दुसरीकडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Surekha Punekar) अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील.
सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.
Explainer: पुन्हा Lockdown होणार का? सध्याची परिस्थिती काय सांगते?
पुणेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचं काही महिन्यापूर्वी दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची ती जागा आता रिक्त झाली. रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली. आता त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसांत पोटनिवडणूक देखील होणार आहे. मात्र, आता अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.