Home /News /pune /

महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना, पुण्यात अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार

महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना, पुण्यात अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून सामूहिक बलात्कार

Pune gang rape

Pune gang rape

Pune gang rape : रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला.

पुणे, 06 सप्टेंबर : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्याचा भयावह चेहरा समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक (auto rickshaw driver) आणि त्याच्या रेल्वेच्या कर्मचारी (railway workers) असलेल्या कामगारांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला गावी जाण्यासाठी मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र आता रात्री गाडी नसून तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. आधी सहा रिक्षाचालक या बलात्कारात सहभागी होतं. IND vs ENG : धक्कादायक! रवी शास्त्रींनंतर टीम इंडियातल्या आणखी दोघांना कोरोना तसंच तिला तिथेच डांबून ठेवण्यात आल्याने एक तारखेला पुन्हा रेल्वेचे कर्मचारी असलेल्या 2 चतुर्थश्रेणी कामगारांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही रुग्णालयात असून सध्या तिची परिस्थिती गंभीर आहे, परंतु स्थिर आहे. पीडित 13 वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत वानवडीमध्ये राहते. 31 ऑगस्टच्या रात्री तिचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशनला येणार होता म्हणून ती पुणे स्टेशनला गेली होती. मात्र तिचा मित्र आलाच नाही. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का? याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणाकरून रिक्षात बसवून घेऊन गेला. कोरोना रुग्णांना मोठा दिलासा! TOCIRA जेनेरिक औषधला मंजुरी, स्वस्तात उपचार होणार त्यानंतर त्या रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला. यात 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वे चे कर्मचारी यांनी अत्याचार केला.  या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आलं होतं. त्यादरम्यान पुन्हा आणखी या मुलीवर कुणी अत्याचार केलाय का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलीची तब्येत स्थिर असल्याचं उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे नराधम अटकेत तर, 1 तारखेला मुलीच्या वडिलांनी तो हरवल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे दिली होती. तिचा शोध घेत असताना रेल्वे स्टेशनहून ती रिक्षात बसल्याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली होती. 31 तारखेला अपहरण झालेली मुलगी 5 तारखेला पोलिसांना मुंबईला जाताना आढळून आली. आरोपींनी तिला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं होतं. ती ताब्यात आल्यानंतर पोलिसांना सामूहिक बलात्कार झाल्याचं लक्षात आलं आणि तातडीने पोलिसांनी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे. मुलीला चंदीगडहून घेतलं ताब्यात तिचा मित्र मुंबईला येणार होता म्हणून तिला मुंबईला जायचं होतं म्हणून ती पुणे स्टेशनला आली होती. तेव्हा रिक्षाचालकाने तिला गाडीच्या वेळी परत आणून सोडतो म्हणून फितवलं आणि रात्री आधी चार जणांनी आणि नंतर 5 जणांनी अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला मुंबईला पाठवलं. तिथे तिचा मित्र आला होता, त्यानंतर ते चंदीगडला गेले. पोलिसांना लोकेशन मिळाल्यावर पोलिसांची टीम चंदीगडला विमानाने गेली आणि तिला ताब्यात घेतलंय. आरोपी हे मिसिंगचा तपास करत असताना स्टेशन वरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून रिक्षात बसताना दिसली. त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याने तेव्हाच पोलिसांना बलात्कार केल्याची माहिती दिली पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र मुलगी मिळून येत नसल्यामुळे पोलीस गडबडले होते. शेवटी तांत्रिक लोकेशन मिळाल्यावर मुलीला ताब्यात घेण्यात आलंय.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या