मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भारतात 'कोरोना'साथ गेली तिसऱ्या टप्प्यात? NCDCच्या सर्व्हेत आले धक्कादायक निष्कर्ष

भारतात 'कोरोना'साथ गेली तिसऱ्या टप्प्यात? NCDCच्या सर्व्हेत आले धक्कादायक निष्कर्ष

काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतात कोरोनाचा खरा स्पाईक हा ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये येणार आहे.

काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतात कोरोनाचा खरा स्पाईक हा ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये येणार आहे.

काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतात कोरोनाचा खरा स्पाईक हा ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये येणार आहे.

पुणे 28 जुलै: दिल्लीतील कोरोना सिरो सर्वेक्षणात तब्बल 23.48 लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्याने भारतात कोरोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सामूहिक संसर्ग पातळीवर पोहोचलीय याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तसंच समाजात कोरोनाची हर्ड इम्यूनिटी खरोखरच तयार होऊ लागली आहे का यावरही बोललं जात आहे. याविषयी National Centre for Disease Control ने दिल्ली आणि इतर काही भागात केलेल्या सर्व्हेमध्ये महत्त्वाचे निष्कर्ष निघाले आहेत. दिल्लीत एनसीडीसीतर्फे जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना सिरो सर्व्हे करण्यात आला होता. त्याचे धक्कादाय निष्कर्ष आता पुढे आले आहेत. 25 जून ते 4 जुलै दरम्यान दिल्लीत सिरो सर्व्हे करण्यात आला. 21357 लोकांच्या अँडीबॉडी तपासण्यात आल्या होत्या. 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळल्याचं स्पष्ट झालं. सिरो सर्व्हे ग्राह्य धरल्यास दिल्लीतल्या मृत्यूदर 0.1 पेक्षाही कमी आयसीएमआर कितीही नाकारत असलं तरी भारतात कम्युनिटी स्पेड्रिंग सुरू झालं असून एकट्या दिल्लीत 23 टक्के जनता कोरोना बाधीत होऊन गेली असावी. पण हा कोरोना व्हायरस क्षीण अथवा सौम्य प्रकारचा असल्याने त्यांच्यात लक्षणं दिसली नसावीत असा अंदाज राज्याचे साथ रोग नियंत्रण सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला. मोठी बातमी! मुंबईत Covid विरुद्ध हर्ड इम्युनिटीची शक्यता सांगणारा अहवाल प्रसिद्ध देशात खरोखरच जर एवढ्या मोठ्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी तयार झाल्या असतील तर मग आपण हर्ड इम्यूनिटीची रिस्क घेऊ शकतो का तर त्याचं उत्तर मात्र तज्ज्ञांकडून दिलं जात नसल्याचं बोललं जातंय.  पण हे कदाचित हर्ड इम्यूनिटी च्या दिशेने पहिलं पाऊल असू शकतं असा अंदाज मात्र आवटे यांनी व्यक्त केला. 'आयएमए'च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल भोंडवे यांनी मात्र हर्ड इम्युनिटीचा पर्याय भारताला परवडणारा नसल्याचं म्हटलं आहे. हर्ड इम्युमिटी येण्यासाठी एकूण लोकसंख्येच्या 70 टक्के लोकांना बाधित होणं गरजेचं आहे. त्यात मुत्यूसंख्या वाढण्याचा धोका संभवतो, असंही डॉ. भोडवे यांनी सांगितलं. COVID-19: पावसाळ्यात या 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर होऊ शकते बाधा काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतात कोरोनाचा खरा स्पाईक हा ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये येणार आहे म्हणूनच सरकारने आरोग्य यंत्रणा अधिकाधिक वाढवल्या तरंच आपण या कोरोनाच्या संकटावर मात करू शकतो. कारण सततच्या लॉकडाऊनमुळे होणारं आर्थिक नुकसान हे नक्कीच देशाला परवडणारं नाही असंही तज्ज्ञांचं मत आहे.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या