पुण्याच्या शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा 'मन की बात'मध्ये, मोदींनी केलं कौतुक

पुण्याच्या शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा 'मन की बात'मध्ये, मोदींनी केलं कौतुक

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात पुण्यातील शेतकरी संस्थेचं कौतुक केलं.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील कथा, गोष्टींच्या परंपरेविषयी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, भारतात बोलक्या बाहुल्यांची परंपरा राहिली आहे. मात्र सद्यपरिस्थितीत विज्ञान आणि त्यासंबंधित काल्पनिक कथा लोकप्रिय होत आहेत. काही ठिकाणी छोटेखानी जोक्स जास्त ऐकले जातात.

यावेळी ते म्हणाले, आपल्या देशाच्या कथांमध्ये प्राणी-पक्षी आणि पऱ्यांच्या कथांचा जास्तअंतर्भाव केला जातो. यामागे विवेक व बुद्धिमत्ता या गोष्टी अधिक सोप्या पद्धतीने समजावल्या जाऊ शकतात. यावेळी विशेष म्हणतजे पंतप्रधान मोदींनी  पुण्याच्या स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा मन की बातमध्ये व्यक्त केली. थेट शेतकरी ते ग्राहक यांच्यात व्यवहार होत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक समाधानी असल्याचं उदाहरण यावेळी मोदींनी दिलं.

हे ही वाचा-BIG NEWS: शिवसेनेनंतर आता भाजपचा सर्वात जवळचा मित्रपक्षही NDAमधून बाहेर

ते पुढे म्हणाले की आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्या देशाचे नागरिक आहोत, जेथे हितोपदेश आणि पंचतंत्राची परंपरा राहिली आहे. कथा ही लोकांची रचनात्मक व संवदेनशील बाजू समोर आणते. जर तुम्हाला गोष्टींची ताकद पाहायची असेल तर जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला रात्री झोपवताना किंवा जेवू घालताना गोष्ट ऐकवते तेव्हा पाहा. प्रत्येक घरात अशी एक मोठी व्यक्ती असते. ज्यामध्ये आजी आजोबा असतील ते आपल्या नातवांना गोष्टीच्या रुपात आपली संस्कृती, परंपरांची माहिती देत असतात. सध्या कोरोनाच्या महासाथीत सर्व जग एक परिवर्तनातून जात आहे. आज दोन माणसांमधील अंतर हे आवश्यक आहे. मात्र याच संकट काळानेच कुटुंबातील सदस्यांना एकत्र येण्यात..त्यांना जोडण्यात महत्त्वपूर्ण काम केलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 27, 2020, 11:57 AM IST

ताज्या बातम्या