गृह प्रदर्शनात नागरिकांनी केली तोडफोड, भ्रमनिरास झाल्यानं गोंधळ

गृह प्रदर्शनात नागरिकांनी केली तोडफोड, भ्रमनिरास झाल्यानं गोंधळ

शहरातील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात आज सकाळी टाटा होम्सतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

  • Share this:

पिंपरी, 20 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भरवण्यात आलेल्या एका प्रदर्शनात नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शहरातील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात आज सकाळी टाटा होम्सतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

पंतप्रधान कोट्यातून मिळणारे शासकीय कर्जासंदर्भात माहिती देण्यासाठी तसंच काहींनी मोफत घरं देऊ अशा स्वरूपाच्या जाहिरातीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील 700 ते 800 नागरिक ह्या प्रदर्शनाच्या ठिकाणी पहाटेपासूनच ताटकळत उभे होते.

पण प्रदर्शन सुरू झाल्यानंतर केवळ कर्जाविषयी आणि बांधकाम व्यावसायिकांची माहिती दिली जात असल्याने उपस्थित नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि संताप अनावर झाल्यानं नागरिकांनी अश्या पद्धतीने तोडफोड केली.

First published: January 20, 2018, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading