पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 महिन्यात सर्वात कमी वाढ, प्रतिबंधित झोनही घटले , जाणून घ्या नवी आकडेवारी

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 महिन्यात सर्वात कमी वाढ, प्रतिबंधित झोनही घटले , जाणून घ्या नवी आकडेवारी

सोमवारी दिवसभरात 391 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर 917 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर 37 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला.

  • Share this:

 पुणे 05 ऑक्टोबर:  राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आता रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. आठवढाभरापूर्वी पुण्यात दररोज  1800 ते 2 हजारांच्या आसपास नव्या रुग्णांची भर पडत होती. सोमवारी दिवसभरात 391 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर 917 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर 37 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 5 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत. 905 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 507 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या 5 महिन्यांमधली ही सर्वात निच्चांकी वाढ आहे. त्यामुळे प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 790 एवढी झालीय. तर सध्या 14841 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृत्यूची संख्या ही 3 हजार 679 एवढी झाली आहे. तर आत्तांपर्यंत 1 लाख 31 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधित झोनच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. प्रतिबंधित झोनची संख्या 71 वरून 59पर्यंत घसरली आहे. 15 झोन कोरोनामुक्त तर फक्त 5 नव्या झोनचा समावेश झाला आहे.

15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू, मात्र केंद्राने घातली मोठी अट; वाचा काय आहेत नवे नियम

पुण्यातील कोरोनाची साथ आता फक्त उपनगरांपुरतीच सिमीत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत आहे. तर उच्चभू सोसायट्यांमधून मात्र कोरोनाचा प्रसार वाढतो आहे.

राज्यात काय आहे स्थिती?

कोरोना विरुद्ध निकराची झुंज देणाऱ्या महाराष्ट्रात दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने राज्याचा Recovery Rate हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे  राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 62 हजार 585 एवढी झाली आहे.

जुलैनंतर 5 पैकी केवळ एका व्यक्तीला मिळणार Corona Vaccine, वाचा सरकारचा प्लॅन

राज्यात दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 263 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 71 लाख 69 हजार 887 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 14 लाख 53 हजार 653 म्हणजे 20 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2 लाख 52 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 5, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या