Home /News /pune /

पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, 24 तासांत 1175 जणांना सट्टी

पुण्यात नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, 24 तासांत 1175 जणांना सट्टी

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत घरातल्या 80 ते 90 टक्के लोकांना व्हायरसची बाधा होत नाही असं आढळून आल्याचं संस्थेचे संचालक डॉ. दिलीप मावळंकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यात आत्तापर्यंत तब्बल 28 हजार 593 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे 26 जुलै: पुण्यात रुग्णसंख्या वाढलेली असतानाचं एक दिलासा देणारी बाबही समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 992 नवे रुग्ण आढळून आले. तर 1175 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केलं आहे. पुण्यात रविवारी 18 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. विविध हॉस्पिटल्समध्ये 682 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 105 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 48057 एवढी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 18298 एवढी झालीय. त्यामुळे पुण्यातल्या एकूण रुग्णांची मृत्यू संख्या 1166 एवढी झालीय. तर आत्तापर्यंत तब्बल 28 हजार 593 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी पुण्यात 2506 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आज राज्यात 9 हजार 431 नवीन रुग्ण आढळले (New Corona Patient) आहेत तर 6044 रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे. COVID-19: डायबेटिसच्या रुग्णांना जास्त काळजीची गरज, आढळून आलीत 2 नवी लक्षणे राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा  आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली. पुणे विभागातील 48  हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33  हजार 649  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. मुंबईसाठी Good News, ‘कोरोना टेस्ट’साठी सुरू होणार आता हायटेक लॅब 31 जुलै रोजी अनलॉक-2 (Unlock 2.0) संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक-3 बाबत सरकार सध्या विचार करत आहे. याअंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केली जाऊ शकतात. सूचना प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, यात सिनेमागृह खुली करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या