धक्कादायक! पुण्यात 9 महिन्यांच्या चिमुकलीसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

Pune Suicide: पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील (Pune Daund Railway ) लोणी काळभोर कॉर्नरजवळ या महिलेनं आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.

Pune Suicide: पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील (Pune Daund Railway ) लोणी काळभोर कॉर्नरजवळ या महिलेनं आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.

  • Share this:
    उरुळी कांचन, 15 डिसेंबर: पुण्यातील (Pune) लोणी काळभोर (Loni KalBhor) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 22 वर्षीय विवाहीतेनं आपल्या 9 महिन्यांच्या चिमुकलीसह आपलं जीवन संपवलं आहे. सदर घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील (Pune Daund Railway ) लोणी काळभोर कॉर्नरजवळ या महिलेनं आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह रेल्वेखाली येऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शीतल देवराम मखवाने (वय- 22) असं या महिलेचं नाव असून तिच्या नऊ महिन्याच्या मुलीचं नाव शुभ्रा असं आहे. या मायलेकींनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी  शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुखे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी शितल आणि त्यांची मुलगी शुभ्रा यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर शितल व शुभ्रा यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या दोघींचे मृतदेह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या कंपनीजवळ आढळून आली आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णलयात पाठवली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. तपासानंतरचं त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकेल.
    Published by:News18 Desk
    First published: