पुण्यात महिलेचा विनयभंग, तर अंधेरीत पाठलाग

पुण्यात महिलेचा विनयभंग, तर अंधेरीत पाठलाग

पुण्यातील खराडी येथील इऑन आयटी पार्कमधल्या एनॉलिटिक्स कंपनीमध्ये एका संगणक अभियंता महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. तर अंधेरीतील महिला आदिती नागपॉलचा पाठलाग करताना नितीश शर्मा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

  • Share this:

10 आॅगस्ट : पुण्यातील खराडी येथील इऑन आयटी पार्कमधल्या एनॉलिटिक्स कंपनीमध्ये एका संगणक अभियंता महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. कंपनीमध्ये सोबत काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केला आहे, असं प्राथमिक पोलिस तपासात समोर आलं आहे . या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून  एनॉलिटिक्स कंपनीच्या पाच अारोपी विरोधात चंदन नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही करवाई होत नसल्याने पीडित महिलेने संबधित आरोपी विरोधात चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

तर अंधेरीतील महिला आदिती नागपॉलचा पाठलाग करताना नितीश शर्मा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नितीश शर्मा हा महिलेच्या घरापर्यंत पाठलाग करत राहिला. आदितीनं पुरवलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. 354 अंतर्गत नितीश शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतल्या मोठ्या आयटी कंपनीत तो अभियंता म्हणून काम करतो.आदितीनं पुरवलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. 354 अंतर्गत नितीश शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 10:03 AM IST

ताज्या बातम्या