मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात मध्यरात्री विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत होता अल्पवयीन तरूण, फोन काढला आणि...

पुण्यात मध्यरात्री विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत होता अल्पवयीन तरूण, फोन काढला आणि...

अल्पवयीन मुलगा विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत असताना महिलेनं त्याला पाहिलं. त्यानंतर या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Published by:  Priyanka Gawde

पुणे, 05 जून : कोरोनाच्या संकटात पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. इथं पोलिसांनी बुधवारी पहाटे एका अल्पवयीन मुलावर विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावल्याच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावत असताना महिलेनं त्याला पाहिलं. त्यानंतर या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार लहान मुलांची काळजी घेण्याचं काम करतात. तसेच, “मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर प्रथम त्याचा फोन ताब्यात घेण्यात आला. त्याचा आयडी तपासल्यानंतर तो 17 वर्षांचा असल्याचं कळलं. या घटनेचे त्यानं कुठलेही रेकॉर्डिंग केले आहे की नाही हे आम्ही अद्याप तपासत आहोत", असे देहू रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सीएम बोरकर यांनी सांगितले.

वाचा-पुणेकरांची आवडती ठिकाणं आजपासून सुरू, अशा आहेत फिरण्याच्या वेळा

दरम्यान, या अल्पवयीन मुलाला त्वरित अटक करण्यात आली नाही. बुधवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. या महिलेनं पोलिसांना सांगितले की तिला खिडकीजवळ कुणीतरी दिसलं आणि तिनं त्या मुलाला जवळून पाहिलं. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगा त्यांच्या शेजारीच राहत असून, त्यांचे घर जवळ आहे.

वाचा-Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण..

या अल्पवयीन मुलाविरूद्ध देहू रोड पोलिस ठाण्यात कलम 354(b) (महिलेची छेडछाड किंवा महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा-पुणे ATS ची मोठी कारवाई, नारायणगाव येथे एकाला शस्त्रासह उचललं

First published:

Tags: Pune news