पुण्यात परप्रांतीय लोंढे वाढले, 8 दिवसांत दंडाची रक्कम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

पुण्यात परप्रांतीय लोंढे वाढले, 8 दिवसांत दंडाची रक्कम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

परप्रांतीय नागरिक मात्र हे नियम स्वतःच पाळताना दिसत नसल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे.

  • Share this:

पुणे, 21 सप्टेंबर : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. पुण्यात कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण, नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तब्बल 3 कोटींचा दंड वसूल झाला आहे.

एकीकडे पुणे जिल्ह्यातील  मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी करण्यात आली असली तरी परप्रांतीय नागरिक मात्र हे नियम स्वतःच पाळताना दिसत नसल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे.

मोठी बातमी! भाजपला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का, कोर्टाने दिले हे आदेश

मागील 8 दिवसांत पुणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणारे कामगार परराज्यातील खाजगी बसमधून मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यात सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.

पोलिसांकडून बऱ्याच ठिकाणी या सगळ्यावर कारवाई केली जात असून  कोरोना नियम न पाळणार्‍या वाहनांवर कारवाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसात 3 कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती  जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.

'मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा मनसे राज्यभर आंदोलन करणार'

मात्र, बाहेरून येणारे लोंढे मात्र थांबताना दिसत नाहीत.  पुणे-नाशिक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलिसांची कारवाई सुरू आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 लाखांवर!

दरम्यान, राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक झालं आहे. 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरून 73वर गेली आहे.  आत्तापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 598 नवे रुग्ण सापडले. तर 455 रुग्णांचा मृत्यू झाला.

FinCEN Files : भारतात 2 लाख कोटींचा भ्रष्टाचार,अनेक मोठी नावं आणि बँकांचा समावेश

त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 12 लाख 8 हजार 642 एवढी झाली आहे. राज्याप्रमाणेच देशातही  कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 21, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading