पुण्यात महिलेनं ओला कॅबमध्ये दिला बाळाला जन्म

पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. पण वाटेतच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली.

पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. पण वाटेतच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली.

  • Share this:
गोपाल मोटघरे, पुणे, 06 आॅक्टोबर : पुण्यात एका महिलेने ओला कॅब कारमध्येच बाळाला जन्म दिला. पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. पण वाटेतच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली. किशोरी सिंग नियमित तपासण्यांसाठी ओला कॅबमधून पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयाकडे निघाल्या, सोबत सासूबाईही होत्या, पण गाडीत बसताच किशोरीला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि वाटेतच त्यांनी बाळाला जन्म दिला. ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठीदेखील हा कसोटीचा क्षण होता. किशोरी प्रसुत झाल्या तरी हॉस्पिटल पाच किलोमीटर लांब होतं. पुण्याच्या वाहतुक कोंडीतून मार्ग काढत तात्काळ हॉस्पिटलला पोहचणं गरजेचं होतं. किशोरी आणि रमेश सिंग यांनी तीन दिवसांच्या बाळाला गुरुवारी घरी आणलं. आणि हॉस्पिटलमधून त्यांना घरी पोहचवण्यासाठी त्यांच्यासाठी देवदूत ठरलेला ओला कॅबचा ड्रायव्हर आला. खरं तर भारतासारख्या महाकाय देशात, कधी विमानात तर कधी रेल्वेमध्ये तर कधी चालू वाहनांमधे मुलांचे जन्म होत असतात. प्रवासादरम्यान काही घटकेचे सोबती असलेले माणुसकीचं असं दर्शन घडवतात.
First published: