पुण्यात तळीरामांनी दारू पिण्यासाठी शोधली स्मशानभूमी, अशा चालतात पार्ट्या

पुण्यात तळीरामांनी दारू पिण्यासाठी शोधली स्मशानभूमी, अशा चालतात पार्ट्या

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या वडगाव रासाईची स्मशानभूमी सध्या दारूचा अड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे.

  • Share this:

शिरूर, 09 जुलै : कोरोनाचा कहर सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी गर्दीला मज्जाव असताना तळीरामांनी मात्र आपला मोर्चा आता थेट स्मशानभूमीत वळवल्याचं चित्र शिरुर तालुक्यातील एका गावात पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या वडगाव रासाईची स्मशानभूमी सध्या दारूचा अड्डा बनवली असून दिवसाढवळ्या येथे दारुड्यांच्या मैफिली रंगताना दिसत आहे.

लाखो रुपये खर्च करून अत्यंत चांगली सुशोभीकरण करून एखाद्या गार्डनसारखी बनवलेली स्मशानभूमी पाहिल्यानंतर खरंतर मरणाचीही भीती दूर होईल. एकेकाळी स्मशानभुमीत जाण्यासही घाबरणारे गावकरी आता सहज फेरफटका किंवा विरंगुळा म्हणूनही या स्मशानभुमीमध्ये जात असतात.

वडगाव रासाई हे शिरुरचे आमदार अशोक पवार यांचं गाव आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या आमदारांच्या गावात असलेल्या स्मशानभुमीत गेल्या काही दिवसापासून वेगळाच अनुभव येत असून येथे फेरफटका मारल्यानंतर आजूबाजूला देशी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. दारू पिणारे इथे पर्यटनाला आल्यासारखे गोल रिंगण करून बसतात. फक्त अंत्यविधी अथवा दशक्रिया विधीसाठी ही जागा सुशोभित केली असून हे ठिकाण सध्या दारू पिणाऱ्यांचे स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे.

'पिंपरी चिंचवडमध्ये जनता कर्फ्यू नको पूर्ण शहरात कडकडीत लॉकडाऊन करा'

बाजार स्थळावरून हाकेच्या अंतरावर ही स्मशानभूमी असून स्मशानभुमीत मोठी झाडे लावलेली आहेत. इथे बसण्यासाठी बाकांची उत्तम सोय आहे. परंतु या सर्व पूरक बाबीचा गावातील तळीरामांनी अगदी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. गावातील नागरिकांची कसलीही भय-भीती या दारुड्यांना नाही. सहजासहजी येथे कारणाशिवाय कोणी फिरकत नाही. दिवसभर केव्हाही आणि कितीही वेळ येथे दारू पिणं सुरु असतं. पोलिसांना याची खबर नाही का ? माहीत असूनही कारवाई केली जात नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक

गेले अनेक दिवस हा प्रकार चालू असून गावचे नाव खराब होत असल्याची बाब समोर येत आहे. तत्काळ यावर कारवाई होणे गरजेचे असून तळीरामांची तळी भरण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

संपादन - रेणुका धायबर

Published by: Renuka Dhaybar
First published: July 9, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading