पुणे, 03 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील चाकण इथल्या शेतकरी पोपट घनवट यांच्यावर आठ ते दहा लोकांनी खुनी हल्ला केला. त्यात घनवट जखमी झाले तर हा हल्ला पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घडवून आणला असल्याचा आरोप, घनवट यांनी केला आहे. घनवट यांच्या फीर्यादीवरुन चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे सध्या रत्नागिरी येथे जात पडताळणी विभागात कार्यरत आहेत.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या विरोधात घनवट यांनी सीआयडी , लाचचुचपत प्रतिबंध विभाग अशा विविध ठीकाणी तक्रारी केल्या त्याचा राग मनात ठेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर घनवट यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
लॉकडाऊनमुळे बंदी असूनही पार्टीसाठी गेले धबधब्यावर, 24 तासानंतर सापडला मृतदेह
दरम्यान, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हे आरोप फेटाळले आहेत. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या एक गुन्ह्यात घनवट यांचा मुलगा आरोपी आहे. त्यात मदत करावी यासाठी घनवट माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत होते. त्याचाच एक भाग म्हणजे माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचं अनोख रक्षाबंधन, जगाला वाचवणाऱ्या बहिणीचा घेतला आशीर्वाद
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं निधन
तर, इतर आरोपींनी घनवट आपली जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप केला आहे. त्यातूनच घनवट यांच्याशी वाद झाला. मात्र, पोलीसांनी फक्त घनवट यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. मात्र, आमच्या तक्रारीची दखल पोलीस घेत नाहीत. असे इतर आरोपींचे म्हणणे आहे.