मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

धक्कादायक: पुण्यात गेल्या 5 दिवसांमध्ये 10 जणांनी केली आत्महत्या

धक्कादायक: पुण्यात गेल्या 5 दिवसांमध्ये 10 जणांनी केली आत्महत्या

आर्थिक ओढाताण कौटुंबिक वाद, नैराश्य आणि डिप्रेशन असे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.

आर्थिक ओढाताण कौटुंबिक वाद, नैराश्य आणि डिप्रेशन असे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.

आर्थिक ओढाताण कौटुंबिक वाद, नैराश्य आणि डिप्रेशन असे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.

पुणे 21 जून : पुणे शहरात (Pune City) कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. त्याचे धक्के बसत असतानाच गेल्या 5 दिवसांमध्ये 10 जणांनी आत्महत्या(suicide) केल्याची माहिती पुढे आल्याने धक्का बसला आहे. आर्थिक ओढाताण कौटुंबिक वाद, नैराश्य आणि डिप्रेशन असे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.आज पहाटे केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केली होती. मुलाच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या आधीही अनेक घटना समोर आल्याने त्याच्या कारणांविषयी चर्चा सुरू झाली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. त्यात पतीपत्नी आणि दोन मुलांची आर्थिक ओढाताणीमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वॉचमनने आत्महत्या केली होती. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात नोकरीवरून काढून टाकल्याच्या ताणातून दोन तरूणांची आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तर समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पती पत्नीने आत्महत्या केल्याचं पुढे आलं होतं. वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत डुक्करखिंडीतून उडी नारून महिलेने आत्महत्या केली होती. तिच्या पतीने आठ दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 19 जून रोजी पुण्यात सामूहिक आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली होती. एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुखसागरनगर परिसरातील वाघजाईनगरात राहणाऱ्या कुटुंबानं टोकचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. अतुल दत्तात्रय शिंदे, पत्नी जया शिंदे यांच्यासह 6 आणि 3 वर्षांची त्यांची दोन लहान मुलांचा सामावेश आहे. मंडप व्यावसिकानेही संपवलं आयुष्य सिंहगडरस्ता परिसरातील धायरी येथे एका मंडप व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी पहाटे दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्वप्निल उत्तम रायकर( 45 वर्षे ) रा. शिव मल्हार नगर, रायकर मळा, धायरी, ता. हवेली जि. पुणे असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय होता. त्यांनी राहत्या घरी किचन रूम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा -  'तुम्ही सैनिक होणार' असं सांगून तरुणांच्या स्वप्नाशी खेळ, अखेर पोलिसांनी... पुण्यात कोरोना हाताबाहेर, एका दिवसात समोर आली रुग्णांची धक्कादायक आकडेवारी संपादन - अजय कौटिकवार    
First published:

Tags: Pune crime, Pune crime news, Suicide news

पुढील बातम्या