मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Crime in Pimpari Chinchwad: पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

पिंपरी चिंचवड, 29 मे: पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीनं फरफटत नेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

संबंधित घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. येथील एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. पोलीस हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यानं इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर त्याने इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-सोलापूर: दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला

यावेळी वाहतूक पोलीस हवालदार इंगळे यांनी आरोपी संजय शेडगे याचा पाठलाग केला आणि पाठिमागून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस हवालदार इंगळे यांचा हात दुचाकीच्या पाठिमागील फायबरमध्ये अडकला. पण आरोपीने दुचाकी वेगात पळवल्याने इंगळे दुचाकीसोबत फरफटत गेले. या घटनेत इंगळे यांना चांगलचं खरचटलं असून फरफटत नेणाऱ्या संजय शेडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime news, Pimpri chinchawad, Pune