पुण्यात आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 122 कोरोना रुग्ण

पुण्यात आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 122 कोरोना रुग्ण

एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339वर जाऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातली संख्या 1491 वर गेली आहे.

  • Share this:

पुणे 28 एप्रिल: पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339वर जाऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातली संख्या 1491 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात ससूनमध्ये आणखी दोन कोरोना पेशंट्सचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर गेली आहे. याशिवाय विविध हॉस्पीटल्समधून तब्बल 73 क्रिटिकल पेशंट्सवर उपचार सुरू आहेत.

यातही समाधानाची बाब म्हणजे तब्बल 24 तासांमध्ये 27 पेशंट्स बरे होऊन घरी परतलेत. त्यात ससूनमधील एका 4 महिन्याच्या बाळाचा आणि 9 वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

आज राज्यात ३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २५, जळगाव येथील ४ तर पुणे शहरातील २ आहेत. मुंबई शहरात आजचे  मृत्यू हे २० ते २८ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत तसेच जळगाव येथील मृत्यू हे मागील चार दिवसातील आहेत.

Work From Home जुलैपर्यंत मिळणार घरून काम करण्याची सूट, केंद्राची घोषणा

राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता एकूण ४०० झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,२९,९३१ नमुन्यांपैकी १,२०,१३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९३१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Lockdown संपायला राहिले फक्त 5 दिवस, सरकारची चिंता वाढली

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९३६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३८.३० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

 

First published: April 28, 2020, 11:36 PM IST

ताज्या बातम्या