पुणे, 30 ऑगस्ट : कोरोनाचं संकट महाराष्ट्रात धडकण्याआधीच दहावीची परीक्षा झाली होती. 10 वीच्या विद्यार्थ्यांचा केवळ भूगोल विषयाचा पेपर घेणं बाकी होतं. कोरोनामुळे या विषयाची परीक्षा घेणं शक्य न झाल्याने इतर विषयांच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे मार्क देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असणारा दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता 11 वी प्रवेशासाठीचा अनेक नामांकित महाविद्यालयांतील 'कट ऑफ' (किमान गुणमर्यादा) जाहीर करण्यात आला आहे.
पुण्यातील दोन महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी किती गुणांचा 'कट ऑफ' जाहीर?
- बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स
अनुदानित - 96.4 टक्के
विना अनुदानित - 95.4 टक्के
- फर्ग्युसन कॉलेज
कला शाखा इंग्रजी माध्यम - 97.4 टक्के
कला शाखा मराठी माध्यम - 92टक्के
विज्ञान शाखा - 97 टक्के
अनलॉक 4 मध्ये शाळांबाबत काय आहे केंद्र सरकारचा निर्णय?
Unlock 4.0 मध्ये टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सर्वप्रथम शाळांमध्ये शिक्षकांना यायची मुभा देण्यात आली आहे. एका वेळी निम्मे शिक्षक शाळेत उपस्थित राहू शकतात. ऑनलाईन शिक्षण, स्टडी मटेरिअर, इतर कामांसाठी शिक्षकांना शाळेत यायची परवानगी. नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनाही काही शंका किंवा काम असेल तर पालकांच्या पूर्वपरवानगीने शाळेत येता येईल.