मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात 'ई-पास'चा काळाबाजार! भामट्यानं चक्क फेसबूकवर केली जाहिरात

पुण्यात 'ई-पास'चा काळाबाजार! भामट्यानं चक्क फेसबूकवर केली जाहिरात

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यात ई-पासचा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यात ई-पासचा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यात ई-पासचा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे, 12 जुलै: कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यात ई-पासचा काळाबाजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-पास काढून देणारा भामट्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांचा 'ई पास' काढून देण्यासाठी पैसे उकळणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. महेश वाघमारे असं आरोपीचं नाव आहे. हेही वाचा...कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक नोंद, 8 मृत्यू '2500/- रुपयात पुणे पोलिसांचा ई पास काढून मिळेल', अशा आशयाची पोस्टच आरोपीनं फेसबूकवर केली होती. याबाबत पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना माहिती मिळताच त्यांनी ई सेवा कक्षाला बनावट ग्राहक पाठवण्याचे निर्देश देऊन या आरोपीला सापळा रचून रंगेहात अटक करण्यात आली. ई पास काढण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, आरोपी महेश वाघमारे गरजू नागरिकांकडून प्रत्येकी 2500/- हजार रुपये उकळत असल्याचं पोलिस चौकशीत समोर आलं आहे. सद्या भारतात, महाराष्ट्रात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात जाण्या-येण्यासाठी शासनाच्या परवानगीने सदर लॉकडाऊन कालावधीमध्ये लोकांची असुविधा होऊ नये म्हणून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक परिस्थितीत उद्भवलेल्या नागरिकांना प्रवासाकरीता लागणारे ई-पास सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, आरोपी महेश वाघमारे याने फेसबुकवर 'cab sevices is available for within pune and out of pune with E-pass. we Also provide E-pass service. Contact 8668508898' अशी पोष्ट केली होती. पोलिसांनी आरोपी महेश वाघमारे याला अटक करण्यालाठी सापळा रचला. पोलिसांनी डमी कस्टमर बनून आरोपी महेशला फोन केला. त्याच्याकडून ऑफिसचा पत्ता वाचारला. ई-पाससाठी 2,000/- रुपये, मेडिलक प्रमाणपत्रासाठी 500/- रुपये असे एकूण 2,500/-रुपये खर्च येईल, असं महेश यानं सांगितलं. आधी 1,500/-रुपये व पास मंजूर झाल्यावर 1,000/-रुपये द्यावे लागतील. पैसे से गुगल-पे द्वारे जमा करा, असंही आरोपीनं सांगितलं. त्याप्रमाणे महेश वाघमारे याचा मोबाईल नं. 8668508898 यावर 1,500/-रुपये गुगल पे द्वारे जमा केले. त्याने आधारकार्डची माहिती मागून लागलीच पीएचसी लोणीकाळभारे, मेडिकल ऑफिसर याचे नावाने संबधीत व्यक्तीची कोणतीही वैद्यकिय तपासणी न करता मेडिकल प्रमाणपत्र व्हॉट्सअप केलं. हेही वाचा...मुख्यमंत्री- ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला, विदर्भ आंदोलन समिती पुन्हा आक्रमक आरोपीनं ई-सेवापासबाबत सुचना व आदेशाचे उल्लंघन करुन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी हडपसर येथील मगरपट्टा साई-सवेरा, भोसलेनगर येथे आरोपीला अटक केली. आरोपीविरुध्द सरकारतर्फे भादंवि कलम 420, 465, 188 प्रमाणे फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

Tags: Pune crime, Pune police

पुढील बातम्या