Home /News /pune /

पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिक सहभागी झाल्यास गुन्हा दाखल होणार

पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिक सहभागी झाल्यास गुन्हा दाखल होणार

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आता कोरोनाने माऊलीच्या महाद्वारात दस्तक दिली आहे.

पिंपरी-चिंचवड, 11 जून: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आता कोरोनाने माऊलीच्या महाद्वारात दस्तक दिली आहे. आळंदीतील 42 वर्षीय मृत महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पस्ट झालं आहे. त्यामुळे समाधी मंदिर परिसर कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिक सहभागी झाल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची इशारा पोलिसांनी दिला आहे. सोहळ्याला आलेल्या बाहेरिल नागरिकांना 14 दिवस क्वॉरटाईन केलं जाईल, नागरिकांनी घरातच बसून पालखी सोहळ्याचे दर्शन घ्यावे, असं आवाहनही पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केलं आहे. हेही वाचा..पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत माऊलीचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 13 ते 30 जून दरम्यान माऊलींच्या पादुका आजोळ घरातील वाड्यात विसावतील. दरम्यानच्या काळात बाहेरील कोणत्याही नागरिकास आळंदीमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती प्रांतअधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.  दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या आळंदीतही आता कोरोनाने दस्तक दिल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. समाधी मंदिर परिसर कंटेन्मेंट विशेष म्हणजे मृत महिला ही समाधी मंदिर परिसरात राहत होती. त्यामुळे आता मंदिराच्या बाहेरील परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट) म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या पोलिस बंदोबस्तात पार पडणार आहे. नियम मोडून आळंदीत प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली 13 तारखेला पालखी प्रस्थान असून मंदिरांमध्ये पालखी, पालखी रथ, अब्दगिरी गरुडटक्के, चौरंग, पाट पादुका या सर्वांना चांदीचा मुलामा देण्याचे काम सुरू आहे. पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करता येतो तर पालखी सोहळा का करता येणार नाही, अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळली आहे. हेही वाचा..तारीख पे तारीख नको, अजित दादा 'हा' निर्णय घ्या; पुण्यातल्या व्यापाऱ्यांची मागणी दरम्यान, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या