Home /News /pune /

गुंडांच्या नावाने बदनाम मुळशीमध्ये आदर्श मतदानाचा पॅटर्न, अधिकारीही सुखावले!

गुंडांच्या नावाने बदनाम मुळशीमध्ये आदर्श मतदानाचा पॅटर्न, अधिकारीही सुखावले!

मुळशी तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. उर्वरित 36 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडले आहे.

मुळशी, 15 जानेवारी : गुंडांचा सर्रास वावर असल्याने नेहमी दहशतीखाली होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मुळशी मधील ग्रामपंचायती निवडणूक (gram panchayat election 2021)  यावेळी सुरळीत पार पडली आहे. त्यामुळे निवडणुकीचा नवा "मुळशी पटर्न" इथे ह्यावेळी बघायला मिळाला. मुळशी तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे.  उर्वरित 36 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडले आहे.  कुठलंही गालबोट न लागता आणि कायदा व्यवस्था राखली जाऊन ही प्रक्रिया पार पडल्या आहे. मुळशीतील ग्रामस्थानांनीही मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला. संध्याकाळपर्यंत 36 गावात कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे गावात मतदानाचा  आदर्श पॅटर्न पाहण्यास मिळाला. गडचिरोलीत शांततेत मतदान पार तर दुसरीकडे मागास भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी मतदारांनी पाच ते दहा किलोमीटर पायी चालत जाऊन मतदान करुन दहशत झुगारुन बॅलेटला पसंती दिली. माओवादप्रभावीत  गडचिरोली जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यात 170 ग्राम पंचायतीसाठी मतदान झालं. राज्यात मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात माओवाद्यांची दहशत असतानाही आदिवासी मतदारांनी तब्बल पाच ते दहा किलोमीटर पायी चालत जाऊन मतदान करुन बॅलेटला पसंती दिली. कडक सुरक्षा बंदोबस्तामुळे कुठलीही घटना घडली नाही. मतदानाची दुपारी दीडपर्यंतची आकडे सत्तर टक्के होती. ही टक्केवारी सरासरी 85 टक्के होण्याची शक्यता आहे. भिवंडीत सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. दोन गटात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे सुनील हरड, कैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला.  या घटनेत पाच जण जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सोलापुरात दोन गटामध्ये दगडफेक तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मतदानावरून दोन गटांमध्ये एकमेकांना तुफान दगडफेक करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावात मतदानावरुन दोन गटात वाद झाला होता.  गावातील भोसले आणि भिंगारे गटात मतदान केंद्राच्याजवळ मतदानाच्या मुद्यावरून वाद उफाळला होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला होता. बाचाबाचीचे रुपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत  दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहे. जखमी कार्यकर्त्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले.  या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Gram panchayat, Pune

पुढील बातम्या