पुणे, 26 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत (sanjay raut) यांना पत्रही लिहिले होते. त्यामुळे राऊत यांनी सव्वा रुपयाचा दावा दाखल केला आहे. 'त्यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही' असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव शेरीत भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत बोलत असताना यावेळी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात चंपा चंपा म्हणून एकच घोषणाबाजी केली. राऊत म्हणाले की, 'मी कशाला त्यांचा चंपा म्हणू? ते माझे चांगले राजकीय मित्र आहे. ते माजी म्हणू नका, असं म्हणत असतील तर भावी म्हणू. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे. पण, त्यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही. मी कोणताही खटला हरत नाही. दोन वर्षांपूर्वी तुम्हाला हरवून दाखवलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला आहे, असं म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
BBMarathi च्या 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा
'आपलं सरकार असलं तरी शेवटी ठोकून काढणं हा आपला मूळ स्वभाव आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीहून परत आले आहे. ते अमित शहांना भेटले असले तरी काळजी नसावी, हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल याची मी शाश्वती देतो. भाजपने कितीही आदळआपट केली तरी ठाकरे सरकारला धोका नाही, असंही राऊत म्हणाले.
Indian Army : बर्फ वितळल्यामुळे तब्बल 16 वर्षांनंतर जवानाचा मृतदेह दिसला
'पुण्यात आता सेनेचे 10 नगरसेवक राहणार नाहीत याची आदित्य शिरोडकर आणि सचिन अहिर यांनी काळजी घ्यावी, त्यासाठीच उद्धवजींनी तुमच्याकडे पुण्याची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर चांगलंच हे नाहीतर आहेच हे आपलं एकला चलो रे. पण काहीही झालं तरी यावेळी पुण्याचा महापौर शिवसेनाच ठरवणार आहे, अशी गर्जनाही राऊत यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.