Home /News /pune /

अजितदादांचं नेमकं दुखणं काय, हे मला चांगलं माहीत, फडणवीसांचा पलटवार

अजितदादांचं नेमकं दुखणं काय, हे मला चांगलं माहीत, फडणवीसांचा पलटवार

'संजय राऊत यांनी काल सांगितले होते की, 100 नेत्यांची यादी केंद्राकडे पाठवणार आहे, आम्हीपण त्यांच्या यादीची वाट पाहत आहोत'

पुणे, 25 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती होत आहे.  तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.  'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांचं नेमकं काय दुखणं आहे, हे मला चांगलं माहीत आहे' असं म्हणत भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला आहे. पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'ईडी तपासाचा भाग पूर्ण करेल. पण, प्रताप सरनाईक हे ईडीला समोर का जात नाहीत. ते सेनेच्या नेत्यांशी भेटता, चर्चा करतात आणि नंतर क्वारंटाइन होतात. त्यामुळे त्यांनी न घाबरता ईडीला सामोरं गेले पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 'संजय राऊत यांनी काल सांगितले होते की, 100 नेत्यांची यादी केंद्राकडे पाठवणार आहे आणि आज राऊत म्हणाले की, आधी चौकशी होऊ द्या, मग यादी पाठवतो. आम्हीपण त्यांच्या यादीची वाट पाहत आहोत त्यांना जेव्हा यादी पाठवायची आहे, त्यांनी पाठवावी', असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिले. 'कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गाजरं द्यावी लागतात, भाजप नेत्यांकडून काड्या पेटवण्याचे काम केले जात आहे',  असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. याबद्दल फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, 'अजित पवार यांचं नेमकं दुखणं काय आहे,  हे मला चांगलं माहीत आहे.  त्यामुले त्यांच्या टीकेवर बोलणार नाही.' 'मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सरकारला अपयश आले आहे. फक्त वेळकाढूपणा सुरू हे त्यामुळे सगळेच विद्यार्थी भरडले गेले आहे.  प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. मुलांचं नुकसान होता कामा नये' असंही फडणवीस म्हणाले. 'पदवीधर निवडणुकीमध्ये बोगस मतदान नोंदणीचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. त्यांनी एका प्रकारे पराभव मान्य केला आहे. मुळात याला कव्हर फायरिंग म्हणतात, कारण इथं एव्हीएमला दोष देण्यासाठी जागा नाही. त्यामुळे त्यांना पराभव समोर दिसत आहे', असा टोलाही फडणवीस यांनी जयंत पाटलांना लगावला. 'हे अनैसर्गिक सरकार आहे. राजकारणाच्या इतिहासात असे सरकार कधीच टीकच नाही. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळल्यानंतर आम्ही पर्यायी सरकार स्थापन करू', असंही फडणवीस यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, NCP, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या