Home /News /pune /

पार्थ पवार यांच्या 'त्या' ट्वीटवर अखेर अजितदादांनी सोडले मौन, म्हणाले....

पार्थ पवार यांच्या 'त्या' ट्वीटवर अखेर अजितदादांनी सोडले मौन, म्हणाले....

आता अलीकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं.

    पुणे, 02 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अखेर यावर मौन सोडत अजित पवार यांनी, 'मला काय तेवढाच उद्योग नाही, असं सांगत आपल्या शैलीत उत्तर दिले. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांना पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या ट्वीटबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी पार्थची भूमिका ही राष्ट्रवादीची नसल्याचे स्पष्ट केले. 'माझी बहीण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही. आता अलीकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं. तुमच्या मुलानं ते ट्वीट केलं. तेवढाच मला उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते.  जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. युवा सेनेच्या नेत्याची हत्या, महिन्याभराआधी वडिलांचा कोरोनामुळे झाला होता मृत्यू 'मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल. ज्याला त्याला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे' असंही अजितदादांनी सांगितले. 'हाथरसमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे.  कुठल्याही पक्षाचे सरकार असेल अशा घटना घडल्या नाही पाहिजेत.  केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारे दहा वेळा विचार करतील', असंही अजितदादा म्हणाले. नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! सरकारचे नवीन नियम न पाळल्यास नाही होणार अप्रेजल 'राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे.  कारण संसद असेल किंवा विधानसभा, तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते. राहुल गांधी तिथं जाण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असं नाही', अशी प्रतिक्रियाही अजितदादांनी दिली. काय म्हणाले पार्थ पवार? 'विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्, असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला. मराठा समाजातील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्यानतंर या मुद्दावर पार्थ पवार यांनी टीव्ट करून मराठा समाजातील नेत्यावर नाराजी सूर लावत सूचक इशारा दिला. नदीपात्रात 3 मुलांसह पती-पत्नीचे तरंगत होते मृतदेह, कारण ऐकून गाव हादरले पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांवर बोट दाखवत पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याचं  राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याआधी राम मंदिर, जय श्रीराम नारा देताना पार्थ पवारांनी घेतल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती. मात्र पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे कौटुंबिक वाद वाढला होता. आता पुन्हा एकदा पार्थ यांच्या भूमिकेमुळे आजोबा नातवामध्ये  मतभेद झाल्याचं बोललं जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या