• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • 'बुधवार पेठेत जी मजा मिळते ती इथं घेऊ' दिराने आणि मित्राने वहिणीवर केला बलात्कार नंतर खून!

'बुधवार पेठेत जी मजा मिळते ती इथं घेऊ' दिराने आणि मित्राने वहिणीवर केला बलात्कार नंतर खून!

दिराने वहिणीला सांगितले आपण 'घर बघायला जाऊ' असं सांगून पांडव कालीन घोरवडेश्वर डोंगरावर नेलं आणि मित्राने अगोदर अत्याचार केला,

दिराने वहिणीला सांगितले आपण 'घर बघायला जाऊ' असं सांगून पांडव कालीन घोरवडेश्वर डोंगरावर नेलं आणि मित्राने अगोदर अत्याचार केला,

दिराने वहिणीला सांगितले आपण 'घर बघायला जाऊ' असं सांगून पांडव कालीन घोरवडेश्वर डोंगरावर नेलं आणि मित्राने अगोदर अत्याचार केला.

 • Share this:
  गणेश दुडम, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 20 सप्टेंबर : पुण्यात (pune) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत दिराने मित्राच्या मदतीने वाहिनीवर अत्याचार (rape) केला आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून आणि दगडाने ठेचून खून (murder) केल्याची घटना पुणे (pune talegaon dabhade) जिल्ह्यातील तळेगांव दाभाडे परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतलं आहे तर मित्र फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहितेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सोनाली (नाव बदललं आहे) असं खून झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. तर तुकाराम धडस असं चुलत दीर आरोपीचे नाव आहे. मयत सोनाली बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी देहूरोड पोलिसांत धाव घेतली आणि मितालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी दरम्यान, बेपत्ता सोनालीचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेहच घोरावडेश्वर डोंगराच्या वरच्या बाजूस आढळून आला. पोलिसांनी महिलेचा पतीला मृतदेह दाखवताच त्याने हंबरडा फोडून आपल्या लाडक्या पत्नीची अवस्था पाहून आरोपी कोण असण्याची शक्यता वर्तवली. लगेच पोलिसांनी सूत्रे हलवली आणि चुलत दीर आरोपी तुकाराम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानेच हा खून केला असल्याची कबुली दिली.  आपल्या मित्राच्या मदतीने अगोदर अत्याचार करून मग खून केल्याची कबुली दिली. तुकारामला मित्राने फोन केला की, 'आपल्याला पुण्यातील बुधवार पेठमध्ये जाऊन मजा करायची आहे त्यावर तुकाराम म्हणाला मी सर्व सोय केलेली आहे तू इथे ये, जी मज्जा पुण्यात मिळते ती इथे घेऊ' मग चुलत दिराने वहिणीला सांगितले आपण 'घर बघायला जाऊ' असं सांगून पांडव कालीन घोरवडेश्वर डोंगरावर नेलं आणि मित्राने अगोदर अत्याचार केला, त्यानंतर चुलत दिराने ही वाहिनीवर बलात्कार करून तिचा खून केला. महंत नरेंद्र गिरी यांनी केली आत्महत्या; सुसाइट नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर आरोपीने सोनालीचा सुरुवातीला ओढणीने गळा आवळला, त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा निर्घृणपणे खून केला. तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगांव पोलीस मित्र आरोपीचा शोध घेत आहे. दरम्यान, दुर्दैवी सोनालीच्या नातेवाईकांनी तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनच्या आवारात टाहो फोडला. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, दोन्ही आरोपींची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवून या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृत महिलेल्या नातेवाईकांनी केली.
  Published by:sachin Salve
  First published: