पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 04 डिसेंबर : पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये रोज म्हटलं तरी एक गुन्हेगारीचा प्रकार समोर येत आहे. मंगळवारीदेखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

जय तेलवाणी असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर संशयाची सुई पत्नीकडे होती. त्यात या सगळ्या आरोपानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

तृप्ती जय तेलवाणी असं पत्नीचं नाव आहे. तृप्ती तिच्या पती, लहान मुलगी आणि सासूसोबत चिखलीमध्ये राहते. तृप्ती रोज तेजचा छळ करायची असा आरोप तेजच्या आई कांचन यांनी लगावला आहे. तर कांचनी यांनी तृप्तीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तृप्ती ही तिच्या नवऱ्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायची. पतीला पैशासाठी मारणे, त्याला कॅन्सर झाला आहे असं त्याच्या मित्रांना सांगणे. या सगळ्याचा तिने एक व्हिडिओदेखील बनवला होता. तो व्हिडिओ तृप्ती तेजच्या मित्रांना दाखावायची. याच सगळ्याच्या नैराश्यातून तेजने आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तृप्तीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आता तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे. तर यात मयत तेजची आई कांचन यांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पती-पत्नी सुंदर नात्याला कलंक लावणाराच हा सगळा प्रकार आहे असंच म्हणावं लागेल.


VIDEO : मोबाईलचं कव्हर घेण्यासाठी हा पठ्ठा दुकानात शिरला, आणि...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 12:19 PM IST

ताज्या बातम्या