मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पत्नी अन् मुलाचा पॉलिथीन बॅगने घोटळा गळा अन् नंतर.. पुणे हादरलं

पत्नी अन् मुलाचा पॉलिथीन बॅगने घोटळा गळा अन् नंतर.. पुणे हादरलं

पत्नी अन् मुलाचा पॉलिथीन बॅगने घोटळा गळा अन् नंतर..

पत्नी अन् मुलाचा पॉलिथीन बॅगने घोटळा गळा अन् नंतर..

पुण्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

वैभव सोनावणे, प्रतिनिधी

पुणे, 15 मार्च : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा पुण्यात नुकताच संशयास्पद मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये 3 जणांचे मृतदेह आढळून आले आहे. पत्नी आणि मुलाचा खून करुन संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली. सुदीप्तो गांगुली (वय 44, रा. डीपी रस्ता, ओैंध) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. सुदीप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. सुदीप्तोचा ‌भाऊ बंगळुरूमधील एका माहिती-तंत्रत्रान कंपनीत कामाला आहे.

काय आहे प्रकरण?

औंध भागात राहणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे 3 मृतदेह मिळाले आहेत. आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि 9 वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतला. हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये काम करत होता. नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली याचा तपास सुरू आहे. प्रियांका सुदीपतो गांगुली (वय. 40), मुलगा तनिष्क गांगुली (वय. 08) आणि पती सुदिप्तो गांगुली (वय. 44) अशी तिघांची नावे आहेत.. मंगळवारी रात्री चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. सुदिपचा भाऊ हा बेंगलोरला असतो. त्याने त्याच्या मित्राकरवी काल हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

वाचा - क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक

सुदीपतो हा आधी आय टी क्षेत्रात काम करत होता. 7-8महिन्यांपूर्वी त्याने आय टी कंपनी मधील नोकरी सोडून एक व्यवसाय करायचे ठरवले होते. याच व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज आहे. बायको प्रियांका आणि मुलगा तनिषक यांना सुदीपतोने विष दिले आणि त्यानंतर त्यांचे पॉलिथिन बॅगने तोंड आवळून निर्घृण हत्या केली. घरातून कुठलीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.

First published:

Tags: Crime, Pune