'फिल्मी स्टाईल' तपास.. चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

शंकेची सुई पत्नी उर्सुला हिच्यावर येऊन थांबल्याने तसेच तिच्या जबाबात भिन्नता आढळल्याने या संपूर्णपणे बनाव असलेल्या समोर आले...

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 09:10 PM IST

'फिल्मी स्टाईल' तपास.. चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

अनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ,30 ऑक्टोबर: चारित्र्यावर संशय घेणाऱ्या तसेच दारुसाठी वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच आपल्या मित्रांच्या मदतीने 'काटा' काढल्याची धक्कादायक घटना निगडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी पत्नी उर्सुला देवदाससह रामभाऊ आरे, रज्जाक शेख, लखन कापरे असे चौघांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या खुनाची सुपारी देणारी फिर्यादी पत्नीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ठरली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात दुर्देवी मृत्युमुखी पडलेला येशुदास हा मूळचा गांधी नगर, देहूरोड येथील रहिवासी होता. मागील अनेक वर्षांपासून पेंटींग करण्याच्या कामानिमित्त तो आकुर्डी येथे हे गुरुदेव नगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. पत्नीसोबत त्याचे नेहमीच वाद व्हायचे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघांमध्ये अनेक वेळा कडाक्याचे भांडणही झाले होते. याला वैतागलेल्या पत्नी उर्सुला देवदास हिने ही सर्व हकीकत आपल्यासोबत काम करणाऱ्या रामभाऊ आरे या मित्राला सांगितली. आरे तसेच उर्सुला या दोघांनी मधला मार्ग काढत यशुदास यांच्या खुनाची सुपारी एक लाख 30 हजार रुपयांत देण्याचे ठरवले. त्यासाठी आरे याने त्याचे ओळखीचे असलेल्या वटास्कीम निगडी येथे राहणाऱ्या रज्जाक शेख तसेच लखन कापरे यांना खुनाची सुपारी दिली. मध्यरात्रीच्या सुमारास येशुदास हा राहत्या घरी झोपेत असताना हल्लेखोर दोघांनी धारदार शस्नाने वार करून झोपेतच येशुचा खून केला. या खुनाबाबतची सगळी कल्पना असलेल्या पत्नीने बनाव करत पती येशुदास याचा अज्ञात हल्लेखोरांनी खून केला असल्याची खोटी फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात देऊन पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, घटनेचा सखोल तपास करत असताना शंकेची सुई पत्नी उर्सुला हिच्यावर येऊन थांबल्याने तसेच तिच्या जबाबात भिन्नता आढळल्याने या संपूर्णपणे बनाव असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात उर्सुला हीच मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या तात्काळ लक्षात आले. पोलिसांनी खाक्या दाखवतात उर्सुला हिने आपल्या पतीची सुपारी एक लाख तीस हजार रुपयात दिल्याची कबुली दिली. या खुनासाठी सात हजार रुपये अॅडव्हान्स तर खून झाल्यानंतर अडीच हजार रुपये मारेकऱ्यांना देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

अवघ्या बारा तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून फिर्यादी पत्नीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच दुचाकी निगडी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.

VIDEO:'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...